Rabi Season : लगबग पीक काढणीची, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर

खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामावरही निसर्गाच्या लहरीपणाचे सावट कायम होते. याचा परिणामही झाला असला तरी उत्पादनावर तो जाणवणार नाही. पण हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग हे होतेच. यंदा रब्बीच्या पेरण्या महिनाभर उशिराने झालेल्या आहेत. शिवाय पीक पध्दतीमध्येही बदल झाला आहे. यामुळे साहजिकच पिकांची काढणीही उशिराने होणार. मात्र, आजही एका शेतकऱ्याने पीक काढणीला सुरवात केली की सबंध शिवारात काढणीला सुरवात ही होतेच. पण पिकांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

Rabi Season : लगबग पीक काढणीची, शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी? वाचा सविस्तर
यंदा रब्बी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला होता. त्यानुसारच उत्पादनातही वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:04 PM

लातूर : खरिपाप्रमाणेच (Rabi Season) रब्बी हंगामावरही निसर्गाच्या लहरीपणाचे सावट कायम होते. याचा परिणामही झाला असला तरी उत्पादनावर तो जाणवणार नाही. पण हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढग हे होतेच. यंदा रब्बीच्या पेरण्या महिनाभर उशिराने झालेल्या आहेत. शिवाय पीक पध्दतीमध्येही बदल झाला आहे. यामुळे साहजिकच पिकांची काढणीही उशिराने होणार. मात्र, आजही एका शेतकऱ्याने (Crop Harvesting) पीक काढणीला सुरवात केली की सबंध शिवारात काढणीला सुरवात ही होतेच. पण पिकांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पीक पूर्णपणे पोसले गेले आहे का? याची शहनिशा करणेही तेवढेच महत्वाचे आहे. याचा फारसा परिणाम ज्वारी, गव्हावर होणार नसला तरी यंदा नव्याने घेतल्या गेलेल्या (Soybean Crop) सोयाबीनवर होणार आहे. त्यामुळे कालावधी पूर्ण झाल्यावरच केलेली काढणी ही उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची राहणार आहे. याबाबत कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. यानुसार काढणी कामे उरकली तर पिकांचे नुकसान हे टळणार आहे.

ज्वारी, गहू, हरभरा काढणीला सुरवात

रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या ज्वारी,गहू आणि हरभरा या पिकांच्या काढणीला सुरवात झालेली आहे. शेतकरी हे पीक पिवळे पडले की काढायला सुरवात करतात. मात्र, या पिकांचे दाणे पक्व झाल्यानंतर याची काढणी केली तर भविष्यातील नुकसान टळणार आहे. पक्वतेची अवस्था पिकाच्या कालावधीनुसार येत असते. यामध्ये ज्वारी ही पेरणीनंतर 130 ते 135 दिवसानंतर काढणी योग्य होते तर चार महिन्यानंतर ज्वारीचे दाणे पाहून काढणी करता येते. गहू हे देखील चार महिन्याचे पीक आहे. हरभरा मात्र, 100 ते 110 दिवसाचे पीक आहे. हा काढणी कालावधी पूर्ण झाला की पक्वता आलेली असती त्या दरम्यान काढणी कामे केल्याने दाण्यावर परिणाम होणार नसल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

सोयाबीनची अशी घ्या काळजी

यंदा उन्हाळी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. उत्पादनवाढीच्या अनुशंगाने शेतकऱ्यांनी हा प्रयोग केला आहे. शिवाय पोषक वातावरणामुळे सोयाबीन हे बहरात असून आता काढणी कामाला सुरवात होणार आहे. पण याची काढणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सोयाबीनच्या शेंगा 90 टक्के पिवळ्या झाल्यावरच काढणी योग्य राहणार आहे. उशिर झाला तर मात्र दाणे गळण्याचा धोका निर्माण होतो.

काढणीनंतर मळणी केव्हा करावी?

ज्वारी, गहू काढणीनंतर शेतकरी केव्हाही मळणी करु शकतात. केवळ काढणी झालेले पीक पावसामध्ये भिजू नये म्हणून सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. यानंतर महिन्याने मळणीची कामे केली तरी उत्पादनावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे चांडक यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Cotton Crop : आवक कमी होऊनही पांढऱ्या सोन्याचीच चर्चा, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही ‘ऐ नहीं झुकेगा’

आनंदवार्ता : 42 वर्षानंतर शेती पाण्याचा मार्ग मोकळा, कथा डोंगरगावच्या तलावाची..!

Grape Damage : ऐकावे ते नवलच, कीडनाशकात आढळले तणनाशकाचे अवशेष, नेमका प्रकार काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.