Kharif Loan : लांबलेल्या पावसाचा परिणाम पीक कर्जावर, काय आहे नेमके कनेक्शन? वाचा सविस्तर

शेतकरी आता समाधानकारक पाऊस झाल्यावरच पीक कर्जाचा विचार करेल असे चित्र मराठावड्यात आहे. विनाकारण कर्ज काढू ते अदा करायचे कसे असा सवाल आहे. तर दुसरीकडे नव्याने कर्जाचे प्रकरण करायचे म्हणल्यावर थकबाकी अदा करावी लागते. पण शेतकरी कर्जासाठीच इच्छूक नसल्यामुळे थकबाकी अदा करण्याचा प्रश्नच नाही. थकीत कर्ज भरुन नवीन प्रकरण करणे ही प्रक्रिया मंदावली आहे. शिवाय जे शेतकरी कर्जासाठी अर्ज करीत आहेत.

Kharif Loan : लांबलेल्या पावसाचा परिणाम पीक कर्जावर, काय आहे नेमके कनेक्शन? वाचा सविस्तर
शेतकरी
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 11:36 AM

जालना : हंगाम कोणताही असो, (Crop Loan) पीक कर्ज वाटपाच्या बाबतीत बॅंकांचा हात हा आखडताच असतोय. यंदा तर तो अधिक तीव्रतने जाणवत आहे. कारण गेल्या 100 दिवसांमध्ये केवळ 25 टक्के कर्जाचे वितरण झाले आहे. यामध्ये बॅंकांची उदासिनता असली तरी त्याच बरोबर (Rain) पावसाने दिलेली उघडीप हे कारणही तेवढेच महत्वाचे आहे. अजूनही (Kharif Sowing) खरिपातील पेरण्यांना पूर्ण क्षमतेने सुरवात झालेली नाही, शिवाय जी धूळपेरणी करण्यात आलेली आहे त्याचीही उगवण झालेली नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये कशाला कर्जाचा डोंगर या धारणेने शेतकरी पीक कर्जाकडे स्वत:हून पाठ फिरवत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्ज घेण्याचे प्रमाण हे नगण्य आहे.

थकबाकी रखडली, नविनची प्रक्रिया मंदावली

शेतकरी आता समाधानकारक पाऊस झाल्यावरच पीक कर्जाचा विचार करेल असे चित्र मराठावड्यात आहे. विनाकारण कर्ज काढू ते अदा करायचे कसे असा सवाल आहे. तर दुसरीकडे नव्याने कर्जाचे प्रकरण करायचे म्हणल्यावर थकबाकी अदा करावी लागते. पण शेतकरी कर्जासाठीच इच्छूक नसल्यामुळे थकबाकी अदा करण्याचा प्रश्नच नाही. थकीत कर्ज भरुन नवीन प्रकरण करणे ही प्रक्रिया मंदावली आहे. शिवाय जे शेतकरी कर्जासाठी अर्ज करीत आहेत. त्यांच्याकडे पूर्वीची थकबाकी आहे. ती अदा केल्याशिवाय नवीन प्रकरण मंजूर होत नाही. त्यामुळे यंदा पीक कर्जाबाबत दुष्काळात तेरावा अशी अवस्था झाली आहे.

पावसामुळे बदलले चित्र

खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची अडचण होऊ नये म्हणून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यावरील व्याजात तर सूट असतेच पण शेतकऱ्यांना ऐन गरजेच्या वेळी ही रक्कम कामी येते. दरवर्षी शेतकऱ्यांची गर्दी असते कर्जासाठी. यंदा मात्र, पावसाने ओढ दिल्याने खरिपावर चिंतेचे ढग आहेत. जून अंतिम टप्प्यात असला तरी सरासरीच्या तुलनेत अल्यल्प पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे खरिपात उत्पादन पदरी नाही पडले तर कर्ज अदा करायचे कसे असा प्रश्न आहे. हा सर्व बदल केवळ पावसाच्या लहरीपणामुळे झाला आहे. जालना जिल्ह्याला 1 हजार 299 कोटी 88 लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात केवळ 304 कोटी 57 लाख 35 हजार वितरण हे झाले आहे.

हे सुद्धा वाचा

पीक कर्ज वितरण करणाऱ्या बॅंका

पीककर्जाचे वाटप हे सेवा सहकारी बॅंका तसेच राष्ट्रीयकृत बॅंकाकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळते. याकरिता त्या बॅंकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी त्या बॅंकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्जही करु शकतात. शिवाय बॅंकांना काही गावे ही दत्तक दिली गेली आहेत. त्यानुसार त्या संबंधित गावांना कर्जपुरवठा करणे हे बॅंकेचे काम आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.