Kharif Season : शेतकऱ्यांनो पेरणीला पोषक वातावरण, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् ‘श्रीगणेशा’ करा

यंदा पाऊस लांबला असल्याने केवळ राज्यातच नाहीतर मध्य प्रदेश आणि इतर राज्यातही पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे तूर, उडीद आणि मुगाचा पेऱ्याकडे आता शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होणार असून सोयाबीनवरच भर राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली असली तरी अनेकांनी पावसाची प्रतिक्षा करीत चाढ्यावर मूठ ही ठेवलेलीच नाही. पण कापूस लागवडीवर मात्र शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे.

Kharif Season : शेतकऱ्यांनो पेरणीला पोषक वातावरण, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् 'श्रीगणेशा' करा
राज्यात सर्वदूर पावसाला सुरवात झाली असून खरिपासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 9:32 AM

नंदुरबार : शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या (Kharif Season) खरीप पेरण्या 15 दिवसांनी लांबलेल्या आहेत. यामुळे कडधान्य वगळता इतर पिकांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवाय ज्या शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली आहे त्यांच्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मात्र, आता (Climate Change) मान्सून आपली कूस बदलत असून मराठवाड्यासह विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण झाले असले तरी 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असे आवाहन केले आहे. हंगामाच्या सुरवातीपासून (Agricultural Department) कृषी विभागाच्यावतीने हेच आवाहन केले जात असले तरी अनेकांनी धूपेरणी करुन दुबार पेरणीचे संकट ओढावून घेतले आहे. पण गेल्या दोन दिवसांपसून वातावरणात झालेला बदल हा आशादायी ठरत आहे.

खरिपाचे चित्र काय ?

यंदा पाऊस लांबला असल्याने केवळ राज्यातच नाहीतर मध्य प्रदेश आणि इतर राज्यातही पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे तूर, उडीद आणि मुगाचा पेऱ्याकडे आता शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होणार असून सोयाबीनवरच भर राहणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली असली तरी अनेकांनी पावसाची प्रतिक्षा करीत चाढ्यावर मूठ ही ठेवलेलीच नाही. पण कापूस लागवडीवर मात्र शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे. उत्पादनात वाढ आणि बाजारपेठेतील दराचा फायदा व्हावा यासाठी कापूस लागवड करण्यात आली होती. पण पावसाने ओढ दिल्याने या क्षेत्रावरही दुबार पेरणी करावी लागणार आहे. एकंदरीत उशिरा का होईना खरिपासाठी पोषक वातावरण झाले असून राज्यभरात आठवड्यात पेरणी कामे अधिक गतीने होतील असा अंदाज आहे.

शेतकऱ्यांचा भर कापूस, सोयाबीनवरच

खरीप हंगामात तेलबियांबरोबर कडधान्यावरही शेतकऱ्यांचा भर असतो. असे असले तरी राज्यातील शेतकरी हे सोयाबीन आणि कापसाचीच अधिक प्रमाणात लागवड करतात. पण यंदा निसर्गावर आधारित पेरणीचे स्वरुप राहणार आहे. सध्याच्या स्थितीमुळे कडधान्याचा पेरा उशीरा केल्यास अपेक्षित उतारा मिळत नाही. त्यामुळे आता तूर, उडीद आणि मुगाचा विषय संपल्यात जमा आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

हे सुद्धा वाचा

कृषी विभागाचा काय आहे सल्ला ?

खरिपाची पेरणी करावी धावून अशी म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत.असे असले तरी यंदा यामध्ये बदल करावा लागला आहे. लांबलेल्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीत पेरणी न करता किमान 75 ते 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहानाला प्रतिसाद दिला असला तरी धूळपेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.