Kharif Season : मान्सूनमुळेच घटली खरिपातील पेरणी, चिंता सोडा अन् कामाला लागा, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?

खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या पेऱ्याला उशीर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक फटका भात शेतीला बसलेला आहे. देशभर सर्वत्रच मान्सून उशिराने सक्रीय झाला त्याचे हे परिणाम आहेत. असे असले तरी आताही पावासाने उघडीप दिली तर शेतकऱ्यांना धान पिकाची लागवड करता येणार आहे. सध्या काही विभागामध्ये पावसाने उसंत घेतली आहे. याचाच फायदा शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Kharif Season : मान्सूनमुळेच घटली खरिपातील पेरणी, चिंता सोडा अन् कामाला लागा, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना काय आहे सल्ला?
50 हजार प्रोत्साहनपर रकमेची आतापर्यंत तीन वेळेस घोषणा झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही या रकमेची प्रतिक्षा आहे.
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 4:00 PM

मुंबई : निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम केवळ महाराष्ट्रातील (Kharif Sowing) पेरणीवरच झाला असे नाही तर इतर राज्यातील पेरणीही घटलेली आहे. गतवर्षीच्या तुलनेत केवळ (Paddy Crop) भातशेतीमध्ये 17.38 टक्क्यांनी खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. पेरणीमध्ये घट झाली असली तरी उत्पादनात भरघोस वाढ राहणार असल्याचा अंदाज (Union Ministry of Agriculture) केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता पावसाने उघडीप दिल्यास कोणत्या पिकाचे उत्पादन घेता येईल याचा अभ्यास कऱणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. देशात 1 जूनपासून मान्सूनला सुरवात झाली तर 14 जुलैपर्यंत सरासरीच्या 14 अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये विभागानुसार पर्जन्यमानात फरक आढळून आलेला आहे. दक्षिण आणि मध्य भारतामध्ये अतिरिक्त पाऊस तर पूर्व आणि ईशान्य भागात पावासाचे प्रमाण हे कमी राहिलेले आहे.

पेरणीला उशीर मात्र अजूनही संधी

खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या पेऱ्याला उशीर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक फटका भात शेतीला बसलेला आहे. देशभर सर्वत्रच मान्सून उशिराने सक्रीय झाला त्याचे हे परिणाम आहेत. असे असले तरी आताही पावासाने उघडीप दिली तर शेतकऱ्यांना धान पिकाची लागवड करता येणार आहे. सध्या काही विभागामध्ये पावसाने उसंत घेतली आहे. याचाच फायदा शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे असल्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. भाताच्या पेरणीला उशीर होऊ शकतो, पण अजूनही वेळ आहे. ‘मान्सून अनपेक्षित राहिला तर त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे, असा एक समज आहे. पाऊस पडणे आणि न पडणे हे आपल्या हातामध्ये राहिलेले नाही. त्यामुळे उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अन्न व व्यापार धोरण तज्ज्ञ देविंदर शर्मा यांनी सांगितले.

अधिकच्या तापमानामुळे रब्बीचे उत्पादन घटले

उन्हाच्या झळांचा परिणाम हा रब्बी हंगामातील उत्पादनावर झाला होता.पिकांची पेरणी होताच कडाक्याचे ऊन पडत असल्याने थेट पिकांवर आणि नंतर उत्पादनावर त्याचा परिणाम झाला होता. तर आता खरिपातील पेरणीवर पावसाच्या लहरीपणाचा परिणाम होत आहे. रबीतील घटत्या उत्पादनामुळे पुन्हा गहू निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती. गव्हाची निर्यात सुरुच राहिली तर देशातील पुरवठ्यावर परिणाम होणार होता त्यामुळे हा निर्णय केंद्राने घेतला होता. यंदाही खरिपात धान पिकाच्या उत्पादनात घट झाली तर तांदूळ निर्यातीवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे संकेत अन्न पुरवठा विभागाने दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

जुलै अखेरपर्यंत खरिपाच्या पेरण्या

थोड्याबहुत प्रमाणात पेरणीत घट झाली तरी त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार नाही. शिवाय जुलै अखेरपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. रब्बीत गव्हाच्या उत्पादनात घट होऊन देखील भारताकडे गव्हाचा साठा कायम आहे. जर निर्यात थांबली तर खाद्यतेल व इतर उत्पादनाचे आयात करण्यास अडचणी निर्माण होतील. त्यामुळे कोणत्याच गोष्टीवर परिणाम होणार नसल्याचे पंजाब कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान खात्याचे के. के. गिल यांनी सांगितले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.