Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane : पुरेशी जमिनीत ओल तरच बियाणे गाढा खोल-खोल, पावसाच्या हुलकावणीनंतर कृषी विभागाचे काय आवाहन?

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्याची एकूण मागणी 12 हजार 489 मेट्रीक टन असून महिना निहाय मंजूर आवंटन 3 हजार 333 मेट्रीक आहे. जिल्ह्यात सध्या युरिया 2 हजार 530 मेट्रीक टन शिल्लक आहे. खरीप हंगामासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेस फंडातून 800 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले आहे.

Thane : पुरेशी जमिनीत ओल तरच बियाणे गाढा खोल-खोल, पावसाच्या हुलकावणीनंतर कृषी विभागाचे काय आवाहन?
पाऊस लांबणीवर गेल्याने पेरण्याही रखडल्या आहे.
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 5:19 PM

ठाणे : खरीप हंगामाला घेऊन जो उत्साह शेतकऱ्यांमध्ये होता तो आता पाहवयास मिळत नाही. कारण (Kharif Season) हंगामाच्या सुरवातीलाच पावसाने निराशा केली आहे. जून महिना आता अंतिम टप्प्यात असतानाही पेरणी योग्य पाऊस तर नाहीच पण पावासाचे एकंदरीत चित्र तरी काय याचा अंदाजच बांधता आलेला नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये (Agricultural Department) कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 16 जूनपर्यंत (Thane) ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या केवळ 13 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई न करता अपेक्षित पावसाची वाट पाहण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात 16 जूनपर्यंत भात पिकाची 0.19 टक्के पेरणी झाली असून नागली 0.39 आणि वरी 0.4 टक्के पेरणी झाली असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले आहे.

कृषी विभागाची तयारी पूर्ण

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्याची एकूण मागणी 12 हजार 489 मेट्रीक टन असून महिना निहाय मंजूर आवंटन 3 हजार 333 मेट्रीक आहे. जिल्ह्यात सध्या युरिया 2 हजार 530 मेट्रीक टन शिल्लक आहे. खरीप हंगामासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सेस फंडातून 800 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले आहे. शेतकऱ्यांनी खते, बियाणे, किटकनाशके खरेदी करतांना अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून निविष्ठांची खरेदी करावी. या निविष्ठांचे पक्के बिल घ्यावे आणि ते तसेच पॅकींग मटेरिअल कापणी पर्यंत जतन करून ठेवणे गरजेचे आहे.

खत-बियाणांचाही पुरवठा

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून जिल्ह्याची एकूण मागणी जिल्ह्यातील खरिपाच्या क्षेत्रानुसार 12 हजार 489 मेट्रीक टन रासायनिक खताची मागणी आहे. महिनानिहाय मंजूर आवंटन 3 हजार 333 मेट्रीक टन आहे. जिल्ह्यात सध्या युरिया 2 हजार 533 मेट्रीक टन शिल्लक आहे. तर महाबीजकडून संकरित आणि सुधारित वाणांच्या बियाणे असे 2 हजार 128 क्विंटल तर खासगी 11 हजार क्विंटल बियाणे प्राप्त झाले आहे.

हे सुद्धा वाचा

उत्पादनवाढीसाठी असे हे प्रयत्न

घटलेले भात पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने भाताचे 8 वाणाच्या बियाणांचे 580 हेक्टर पीक प्रात्याक्षिके केली आहेत. यामधून 232 क्विंटल पुरेल एवढे बियाणे 50 टक्के अनुदनावर शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले आहे. भात व नागली पिकाची उत्पादकता कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना 10 वाणाच्या आतील सुधारीत बियाणाच्या बॅगा ह्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून देण्यात आल्या आहेत.

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.