Agricultural : सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्याच्या वाट्याला किती नुकसानभरपाई, शेतकऱ्यांना दिलासा की निराशा..!
मराठवाड्यात पर्जन्यमान तसे कमीच असते. पण हंगामाच्या सुरवातीलाच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात पावसाने कहर केला होता. जुलै ह्या एकाच महिन्यात सरासरीपेक्षा दुपटीने पाऊस झाला होता. त्यामुळे साहजिकच नुकसानीच्या झळाही अधिकच होत्या. सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन ह्या पिकाचे झाले होते.
नांदेड : उशिरा का होईना (State Government) राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. 15 सप्टेंबरपर्यंत ही मदत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्यासाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरी सर्वाधिक पाऊस झालेल्या (Nanded District) नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रक्कम अदा केली जाणार याकडे लक्ष लागले होते. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याबदल्यात नांदेडकरांसाठी 877 कोटींची रक्कम जाहिर करण्यात आली आहे. शिवाय 15 सप्टेंबरपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे संकेतही राज्य सरकारने दिले आहेत. उशिरा का होईना आता रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
नांदेडला दुहेरी फटका
मराठवाड्यात पर्जन्यमान तसे कमीच असते. पण हंगामाच्या सुरवातीलाच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात पावसाने कहर केला होता. जुलै ह्या एकाच महिन्यात सरासरीपेक्षा दुपटीने पाऊस झाला होता. त्यामुळे साहजिकच नुकसानीच्या झळाही अधिकच होत्या. सर्वात जास्त नुकसान हे सोयाबीन ह्या पिकाचे झाले होते. अधिकच्या पावसाबरोबर बाधित क्षेत्रही याच जिल्ह्यातील जास्तीचे होते.
15 सप्टेंबरपासून रक्कम खात्यामध्ये
राज्यातील नुकसानीचा आढावा घेऊन राज्य सरकारने मदत रक्कम घोषित केली आहे. या रकमेचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होणार असून 15 सप्टेंबरपासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा हा यामधून वगळण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता प्रत्यक्ष मदतीला सुरवात होत आहे.
ऐन सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा
सध्या सण उत्सव सुरु आहेत. अशातच शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आर्थिक संकटात असतानाच राज्य सरकारने केलेल्या घोषणेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण सण उत्सव सुरु असल्याने पैशाची गरज निर्माण झाली होती. केवळ घोषणाच नाहीतर 15 सप्टेंबरपासून लाभ मिळणा असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
सर्वाधिक मदत सोयाबीन उत्पादकांना
मराठवाड्यासह विदर्भात आता सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पण खरिपात पेरणी होऊन पिकांची उगवण होताच मराठवाड्यात तब्बल महिनाभर पावसाने उघडीप दिली नव्हती. त्यामुळे सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनचे झाले होते. सोयाबीनच्या नुकसानीपोटीच शेतकऱ्यांना ही मदत रक्कम मिळणार आहे. गरजेच्या वेळीच पैसे पदरी पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे.