Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला?

गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशकाचा वापर करावा लागणार आहे. याचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षतेसाठी हातमोजे घालणे गरजेचे आहे. ज्या भागात शंखी गोगलगायचा अधिकचा प्रादुर्भाव आहे त्या क्षेत्रावर अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास त्याचा अधिकचा फायदा होणार आहे.

Kharif Crop : पिकांची उगवण होताच कशाचा धोका? वेळीच व्यवस्थापन करा अन् उत्पादनात वाढवा, काय आहे कृषिज्ञांचा सल्ला?
शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव खरीप हंगामातील पिकांवर होत आहे.
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 1:16 PM

नांदेड : पावसाने ओढ दिल्याने (Kharif Sowing) खरिपातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे मराठवाड्यात जूनच्या अखेरीस झालेल्या पेरणी झालेल्या सोयाबीन, कापसाची (Germination of crops) उगवण आता कुठे झाली आहे. मात्र, पावसाचे संकट मिटताच आता पिकांना (Pest disease) कीड रोगराईचा सामना करावा लागत आहे. खरिपातील पिकांसह भाजीपाल्यावर सध्या शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव वाढत आहे. रोपअवस्थेतच प्रादुर्भाव वाढत असल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. योग्य वेळीच उपाययोजना केली तरच पिकांवर त्याचा परिणाम होणार नाही अन्यथा आगोदर पावसामुळे आणि आता किडीच्या प्रादिर्भावमुळे नुकसान होईल अशी स्थिती सध्या मराठवाड्यात पाहवयास मिळत आहे.

असे करा एकात्मिक व्यवस्थापन

पिकांची उगवण होताच किडीचा प्रादुर्भाव झाला तर मात्र वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांध हे तणविरहीत ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे गोगलगाईला थांबण्यासाठी सुरक्षित जागा राहणार नाही. सकाळी किंवा संध्याकाळी ह्या गोगलगायी ह्या साबणाचे किंवा मिठाचे पाणी घेऊन त्यामध्ये मारुन टाकाव्यात. पिकाच्या क्षेत्रात 7 ते 8 मीटरवर वाळलेल्या गवताचे बुचाडे उभा करावेत. जेणेकरुन गोगलगायी त्याच्या आश्रयाला येतील आणि मग त्या अंडी घालण्यास एकत्र आल्यावर त्या नष्ट कराव्या लागणार आहेत. लहान शंखीसाठी मिठाची किंवा कॅल्शिअम क्लोराईडचासुध्दा वापर करता येणार आहे.

सुरक्षतेसाठी प्लॅस्टिक हातमोज्यांचा वापर

गोगलगायीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नाशकाचा वापर करावा लागणार आहे. याचा वापर करताना शेतकऱ्यांनी सुरक्षतेसाठी हातमोजे घालणे गरजेचे आहे. ज्या भागात शंखी गोगलगायचा अधिकचा प्रादुर्भाव आहे त्या क्षेत्रावर अशा पध्दतीने उपाययोजना केल्यास त्याचा अधिकचा फायदा होणार आहे. शिवाय लवकरात लवकर उपाययोजना केल्यास त्याचा प्रादुर्भाव तर कमी होईलच पण पिकांच्या वाढीतील अडथळाही दूर होणार असल्याचा सल्ला परभणी कृषी विद्यापीठातील डॉ. डी.डी. पाटईत यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

फळबागांचे रक्षणासाठी हा आहे पद्धत

मुळात गोगलगायीला झाडावर चढूच द्यायचे नाही. त्यासाठी फळांच्या झाडांच्या खोडास 10 टक्के बोंडपेस्ट करावे लागणार आहे. तर गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड या दाणेदार नाशकाचा वापर करावा लागणार आहे. सोयाबीन व कापसू यासारख्या पिकांसाठी मेटाल्डिहाईड हे दोन किलो प्रति एकरसाठी असे प्रमाण ठेवावे लागणार आहे. ही गोगलगाय पपईची रोपे आणि झेंडूच्या रोपांकडे आककर्षित होतात. त्यामुळे मेटाल्डिहाईडच्या गोळ्या ह्या पपईच्या पानाजवळ ठेवल्या तरी या गोगलगायीचा बंदोबस्त होणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.