Summer Crop: उन्हाळी सोयाबीन बहरात असतानाच कृषी विभागाचा अंदाज काय? शेतकऱ्यांचा उद्देश होणार का साध्य?

उन्हाळी हंगामात पोषक वातावरण, मुबलक पाणी आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते पीक पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल केला होता. रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी आणि मक्याचा ठरलेला पेरा पण यंदा मराठवाड्यातला शिवार उन्हाळी सोयाबीनने बहरलेला दिसत आहे. आतापर्यंतच्या पोषक वातावरणामुळे पीक बहरात असून आता शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे.

Summer Crop: उन्हाळी सोयाबीन बहरात असतानाच कृषी विभागाचा अंदाज काय? शेतकऱ्यांचा उद्देश होणार का साध्य?
नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन बहरात असून उत्पादनात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 11:26 AM

नांदेड : (Summer Crop) उन्हाळी हंगामात पोषक वातावरण, मुबलक पाणी आणि (Agricultural Department) कृषी विभागाचे मार्गदर्शन यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते पीक पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल केला होता. रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी आणि मक्याचा ठरलेला पेरा पण यंदा मराठवाड्यातला शिवार उन्हाळी (Soybean) सोयाबीनने बहरलेला दिसत आहे. आतापर्यंतच्या पोषक वातावरणामुळे पीक बहरात असून आता शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. असे असतानाच कृषी विभागाकडून उत्पादकता अंदाज वर्तवला जातो. पिकाची अवस्था पाहून उन्हाळी सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह तर वाढलेला आहेच पण त्याच बरोबर उर्वरित महिनाभर या पिकाची योग्य ती काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

खरिपाची कसर उन्हाळी हंगामात भरुन निघाली

खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावासाचा सर्वाधिक परिणाम हा सोयाबीन याच मुख्य पिकावर झाला होता. त्यामुळे उत्पानात तर घट झालीच शिवाय सोयाबीन हे पावसामुळे डागाळले होते. मात्र, याच दरम्यान झालेल्या पावसाचा फायदा शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात घेण्याचा निर्धार केला होता. शिवाय यासाठी कृषी विभागाचेही मार्गदर्शन लाभले होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी हे धाडस केले होते. खरिपात बियाणे उपलब्ध व्हावे हाच यामागचा कृषी विभागाचा उद्देश होता.मात्र, पोषक वातावरण आणि अपेक्षेपेक्षा वाढलेले क्षेत्र यामुळे आता सोयाबीनमधून चार पैसे देखील शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.

बियाणांसाठी उन्हाळी सोयाबीनच महत्वाचे

खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असले तरी उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे बियाणेच खरिपात वापरणे गरजेचे आहे. कारण खरिपापेक्षा दर्जेदार सोयाबीन हे उन्हाळी हंगामातच मिळते. खरिपातील सोयाबीन काढणीच्या दरम्यान परतीचा पाऊस सुरु असतो. सातत्याने पावसात भिजलेल्या सोयाबीनचे बियाणे हे दर्जेदार मिळत नाही म्हणून उन्हाळ्यातील सोयाबीन हे बीजप्रक्रियेसाठी वापरले जाते. यंदा तर पोषक वातावरणामुळे खरिपातील बियाणांचा तर प्रश्न मार्गी लागणारच आहे. पण यामधून शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळणार आहे.

उत्पादनबद्दलच्या अफवा ठरल्या फोल

उन्हाळी हंगामातील सोयाबीनला उतारा हा कमीच असतो असे म्हटले जात होते. त्यामुळे क्षेत्र वाढूनही उत्पादन वाढणार की नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात होती. पण सध्या शेतशिवारात सोयाबीन मोठ्या डोलाने बहरत आहे. अजून काढणीसाठी महिन्याचा कालावधी असला तरी शेतकऱ्यांनी वाढत्या उन्हात पाण्याचे योग्य नियोजन केले तर विक्रमी उत्पादन होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

संबंधित बातम्या :

Nashik : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, कारखान्याची टाळाटाळ अन् महावितरणच्या मनमानीचा शिकार ठरतोय शेतकरी

Turmeric Crop: अवकाळीच्या धास्तीने रखरखत्या उन्हात जगाचा पोशिंदा राबतोय, हळदीच्या विक्रमी दरासाठी धडपडतोय

Summer Crop : उन्हाळी सोयाबीनचा शेवटचा महिना, योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनात होईल वाढ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.