Grape Damage : ऐकावे ते नवलच, कीडनाशकात आढळले तणनाशकाचे अवशेष, नेमका प्रकार काय?

द्राक्ष उत्पादकांना निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करावे लागत असताना पंढरपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती. वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव बागांवर झाल्याने कासेगाव आणि तळणी शिवारातील शेतकऱ्यांनी क्लोरपारिफॉस घटक असलेल्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली होती. यामुळे बागांमध्ये सुधारणा तर सोडाच पण द्राक्ष बागा जळाल्या अन् घड सुकले अशी अवस्था झाली होती. त्यामुळे या रासायनिक कीटकनाशकाची प्रयोगशाळेत तपासणी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

Grape Damage : ऐकावे ते नवलच, कीडनाशकात आढळले तणनाशकाचे अवशेष, नेमका प्रकार काय?
रासायनिक कीडनाशकाच्या फवारणीमुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले होते.
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 10:58 AM

सोलापूर : (Grape Grower) द्राक्ष उत्पादकांना निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करावे लागत असताना पंढरपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांसमोर एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती. (Climate Change) वातावरणातील बदलामुळे रोगराईचा प्रादुर्भाव बागांवर झाल्याने कासेगाव आणि तळणी शिवारातील शेतकऱ्यांनी क्लोरपारिफॉस घटक असलेल्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी केली होती. यामुळे बागांमध्ये सुधारणा तर सोडाच पण (Vineyards) द्राक्ष बागा जळाल्या अन् घड सुकले अशी अवस्था झाली होती. त्यामुळे या रासायनिक कीटकनाशकाची प्रयोगशाळेत तपासणी व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. आता चार दिवसानंतर अहवाल प्राप्त झाला असून या क्लोरपारिफॉस घटक असलेल्या रासायनिक कीटकनाशकात चक्क तणनाशकाचे अवशेष असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या बागांचे नुकसान झाले असल्याचेही निष्पन्न झाले आहे.पुण्यातील खासगी प्रयोगशाळेत शेतकऱ्यांनी याची तपासणी केली होती.

नेमका प्रकार काय ?

मध्यंतरीच्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागांवर कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. अंतिम टप्प्यात नुकसान नको म्हणून कासेगाव आणि तळणी येथील शेतकऱ्यांनी क्लोरपारिफॉस घटक असलेल्या रासायनिक कीटकनाशकाची फवारणी होती. यामुळे द्राक्ष बाग आणि द्राक्ष घड यामध्ये सुधारणा होण्याऐवजी द्राक्ष बागा जळाल्या तर द्राक्षाचे घड हे कुजले. हे सर्व अचानक झाले आणि ऐन तोडणीच्या प्रसंगीच झाल्याने शेतकऱ्यांनी या कीटकनाशकामुळेच झाले असल्याची शंका उपस्थित केली. संबंधित विक्रेता प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट प्रयोगशाळेत या कीटकनाशकाची तपासणी करण्याचे ठरवले. याकरिता द्राक्षांचे देठ आणि काड्यांचा नमुना पाठवण्यात आला होता. यावरुन हे समोर आले आहे.

क्रीयशील घटकाचे प्रमाण कमी

कीटकनाशकाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आवश्यक असलेल्या क्लोरपारिफॉसचे प्रमाण हे प्रमाण हे 1.5 असे असल्याचे कंपनीने दाखवले आहे. पण प्रत्यक्षात तपासणी केली असता हे प्रमाण केवळ 0.52च असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रासायनिक कीटकनाशकाचा काही परिणाम तर झाला नाही पण ग्लायफोसेटचे प्रमाण 0.602 मिलीग्रम असे होते. यावरुन तणनाशकाचेच प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.

शेतकऱ्यांची कारवाईची मागणी

अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट झालेली आहे. शिवाय यंदा खर्चही वाढलेला आहे. यातच औषध फवारणीतून असे नुकसान झाल्याने कासेगाव आणि तनाळी येथील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी कृषी विभागाकडे केली आहे.

संबंधित बातम्या :

Pomegranate Garden : कीड-रोगाने डाळिंब बागांना घेरले, आता कृषी विभागाच्या मोहीमेने मिळणार का नवसंजीवनी!

Mango : फळांच्या राजा यंदा निसर्गाच्या कचाट्यात, उत्पादन घटल्याने चवही महागणार

Rabi Season : उन्हाळी हंगामातील मका जोमात पण ‘मर’ रोगामुळे कोमात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.