Kokan : जांभूळ पिकल्या झाडाखाली..! अहो, यंदा जांभूळ पिकले नाहीतर सुकले, कशामुळे उत्पादन घटले?

कोकणातील डहाणू परिसरातील काही गावांमध्ये बहाडोलीच्या जांभळाचे उत्पादन घेतले जाते. इतर भागात जशी पिकांची जोपासणा केली जाते तशी येथे जांभळाची. जांभळाच्या विशिष्ट चवीमुळे केवळ मुंबईतच नाहीतर राज्यभर या जांभळाला मागणी असते. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या जांभळांची आवक सुरु होते.

Kokan : जांभूळ पिकल्या झाडाखाली..! अहो, यंदा जांभूळ पिकले नाहीतर सुकले, कशामुळे उत्पादन घटले?
वातावरणातील बदलामुळे कोकणातील जांभळाच्या उत्पदनात घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 12:35 PM

डहाणू : निसर्गाचा लहरीपणा केवळ (Mango Production) आंबा उत्पादनापर्यंतच मर्यादित राहिला नाही तर त्याची झळ (Jamun Production) जांभळापर्यंत येऊन ठेपली आहे. अवकाळीमुळे सर्वाधिक नुकसान हे फळबागांचे झाले होते तर कडाक्याच्या उन्हाचा परिणाम यंदा बहाडोलीच्या टपोरी जांभळावर झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यच्या तोंडावर ही जांभळ बाजारपेठेत दाखल होत असतात पण यंदा (Climate Change) हवामानातील बदलामुळे कोकणाती तब्बल 90 टक्के उत्पादन घटले आहे. केवळ उत्पादनच घटले असे नाहीतर डहाणू भागातील तीन गावच्या ग्रामस्थांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कारण येथे पिकणाऱ्या बहाडोलीच्या जांभळाला हजार रुपये किलो असा दर मिळतो. पण यंदा मागणी असतानाही घटलेल्या उत्पादनामुळे बाजारपेठेत ही जांभळ दाखलच झाली नाहीत.

बहाडोलीच्या जांभळाला देशभर मागणी

कोकणातील डहाणू परिसरातील काही गावांमध्ये बहाडोलीच्या जांभळाचे उत्पादन घेतले जाते. इतर भागात जशी पिकांची जोपासणा केली जाते तशी येथे जांभळाची. जांभळाच्या विशिष्ट चवीमुळे केवळ मुंबईतच नाहीतर राज्यभर या जांभळाला मागणी असते. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या जांभळांची आवक सुरु होते. शिवाय हंगामाच्या सुरवातीला प्रतिकिलो 8 ते 10 हजार रुपये किलो असा विक्रमी दर मिळतो. यंदा मात्र, 90 टक्के उत्पादन घटल्याने अजून मुंबई मार्केटमध्येच मागणीच्या तुलनेत आवक झालेली नाही.

तीन गावांवर उपासमारीची वेळ

कोकणातील बहाडोली, धुकटन आणि खामलोली या गावच्या शिवारात केवळ जांभळाच्या उत्पादनावर भर दिला जातो. या भागातील 400 शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा 4 हजार जांभळावरच असतो. प्रत्येक झाडामधून 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न हे ठरलेले असते. यंदा मात्र, अवकाळी पावसाने उत्पादन प्रक्रियेच अडथळा निर्माण झाला तर जांभूळ पोसण्याच्या दरम्यान कडाक्याच्या उन्हामुळे जांभळ अक्षरश: करपली गेली. त्यामुळे 3 ते 4 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. केवळ 10 उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहे.

हे सुद्धा वाचा

ना भरपाई ना महोत्सव

जांभळाचे झाड जोपासण्यासाठी 15 हजार रुपये खर्च येतो तर यंदा उत्पादनच न मिळाल्याने कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. शिवाय या शेतकऱ्यांना पीक विम्याचाही लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण वैभवात भर टाकणारा जांभूळ महोत्सवही यंदा रद्द झाला आहे. जांभळाचा मोहरच करपल्याने महोत्सावासाठीही जांभळे मिळणे अशक्य झाले आहे. जांभळाच्या संवर्धनाकडे कृषी विभागानेही दुर्लक्ष केल्याने ही वेळ आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.