Cotton Crop : आवक कमी होऊनही पांढऱ्या सोन्याचीच चर्चा, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही ‘ऐ नहीं झुकेगा’

शेतीमालाच्या दरात चढ-उतार हे ठरलेलेच असतात. शिवाय आवकवरुन याचे दर ठरतात. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून ते आता अंतिम टप्यात कापूस पिकाने महत्व टिकवून ठेवले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असून संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी मागणीपेक्षा केव्हाच अधिकची आवक केली नाही. त्यामुळे दर टिकून होते. शिवाय रशिया आणि युक्रेन युध्दाचा परिणाम कापसाच्या दरावर होणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले होते. पण स्थानिक पातळीवर आजही कापूस 10 हजाराच्या पार आहे.

Cotton Crop : आवक कमी होऊनही पांढऱ्या सोन्याचीच चर्चा, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही 'ऐ नहीं झुकेगा'
यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 12:18 PM

परभणी : शेतीमालाच्या दरात चढ-उतार हे ठरलेलेच असतात. शिवाय आवकवरुन याचे दर ठरतात. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून ते आता अंतिम टप्यात (Cotton Crop) कापूस पिकाने महत्व टिकवून ठेवले आहे. यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची राहिली असून संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांनी मागणीपेक्षा केव्हाच अधिकची (Cotton Arrival) आवक केली नाही. त्यामुळे दर टिकून होते. शिवाय रशिया आणि युक्रेन युध्दाचा परिणाम (Cotton Rate) कापसाच्या दरावर होणार असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले होते. पण स्थानिक पातळीवर आजही कापूस 10 हजाराच्या पार आहे. मराठवाड्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परभणी बाजारपेठेत 10 हजार 550 ते 10 हजार 600 पर्यंतचा दर टिकून आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाचीही विक्री केली आहे. आता हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अनेकांनी फरदडचे उत्पादन हे घेतलेले आहेच.

यंदाच्या हंगामात विक्रमी दरॉ

खरीप हंगामातील कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. पण या पदरी पडलेल्या या पांढऱ्या कापसाचे सोनं करण्याचा निर्धारच जणू काही शेतकऱ्यांनी केला होता असेच चित्र हंगामाच्या सुरवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत कायम राहिलेले आहे. अपेक्षेप्रमाणे दर असेल तरच विक्री अन्यथा साठवणूक. त्यामुळेच गेल्या 50 वर्षात जो दर विदर्भात मिळाला नव्हता त्या दरात व्यापारी शेतकऱ्यांच्या दारात येऊन खरेदी करीत होता. उत्पादन घटले तरी वाढीव दरातून झालेला खर्च काढण्याचा शेतकऱ्या्ंनी सर्वकश प्रयत्न केला आहे. आता अंतिम टप्प्यातही 10 हजारापेक्षा अधिकचा दर हा कायम आहे.

कापसाच्या आवकमध्ये घट

वाढत्या मागणीमुळे यंदा प्रथमच व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कापसाची खरेदी केली आहे. शिवाय जागोजागी खरेदी केंद्रही उभारले गेले होते. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळेच परभणीसारख्या मुख्य बाजारपेठेतही दिवसाकाठी 400 क्विंटल कापसाची आवक सुरु आहे. शिवाय साठवणूकीतल्या कापसाचीही शेतकऱ्यांनी विक्री केलेली आहे. सध्या कमाल दरात वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

आता फरदडच्या उत्पादनावर लक्ष

मुख्य कापूस हंगाम संपला तरी फरदडच्या माध्यमातून कापसाचे उत्पादन घेण्याची शेतकऱ्यांची परंपरा आहे. हे जरी नुकसानीचे असले तरी शेतकरी उत्पादन घेतातच. यातच यंदा विक्रमी दर मिळत आहे शिवाय शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही उपलब्ध आहे. त्यामुळे पाणी देऊन पुन्हा कापसाचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दर टिकून राहणार असल्यानेच शेतकरी हे धाडस करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Grape Damage : ऐकावे ते नवलच, कीडनाशकात आढळले तणनाशकाचे अवशेष, नेमका प्रकार काय?

आनंदवार्ता : 42 वर्षानंतर शेती पाण्याचा मार्ग मोकळा, कथा डोंगरगावच्या तलावाची..!

Pomegranate Garden : कीड-रोगाने डाळिंब बागांना घेरले, आता कृषी विभागाच्या मोहीमेने मिळणार का नवसंजीवनी!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.