Drone Farming : स्वप्न सत्यात, शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे पीक फवारणीची प्रात्याक्षिके, 8 मिनिटांमध्ये 1 एकरावरील फवारणी शक्य

ड्रोन शेती हा शेतकऱ्यांसाठी अभिनव उपक्र आहे. त्यामुळे त्याची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून तज्ञ मंडळीला आमंत्रित केले जात असून एरोनिका टक्नॉलॉजीचे स्वप्नील शेंडे यांनी ड्रोनच्या तांत्रिक बाबीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय ड्रोन शेतीचे फायदेही शेतकऱ्यांना सांगण्यात आले. ड्रोनद्वारे 8 मिनिटांमध्ये 1 एकराचे क्षेत्र फवारणी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत आणि कष्टामध्येही बचत होणार आहे.

Drone Farming : स्वप्न सत्यात, शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे पीक फवारणीची प्रात्याक्षिके, 8 मिनिटांमध्ये 1 एकरावरील फवारणी शक्य
शेती व्यवसायात ड्रोन वापराबद्दल शेतकऱ्यांना आता प्रात्याक्षिके दिली जात आहेत.
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 12:38 PM

सोलापूर : गेल्या 6 महिन्यांपासून (Drone Farming) ड्रोनचा शेती व्यवसायात वापर करण्याबाबत (Central Government) केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यामुळे किटकनाशकांवर फवारणी करण्याचा पहिला उपक्रम असून त्याअनुशंगाने शेतकऱ्यांना प्रात्याक्षिके दिली जात आहेत. (Farming) शेती व्यवसायात आत्याधुनिक यंत्राचा वापर वाढवून शेतकऱ्यांची वेळ बचत व्हावी शिवाय कष्टही कमी करण्याच्या हेतूने ड्रोन शेतीवर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवर आता शेतकऱ्यांना धडे दिले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील मोहळ तालुक्यात शेतकऱ्यांना ड्रोन शेतीविषयी प्रात्यक्षिक देण्यात आले आहे. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या माध्यमातून या अत्याधुनिक शेतीबाबत जनजागृती केली जात आहे.

8 मिनिटांमध्ये 1 एकरावरील फवारणी

ड्रोन शेती हा शेतकऱ्यांसाठी अभिनव उपक्र आहे. त्यामुळे त्याची माहिती देण्यासाठी कृषी विभागाकडून तज्ञ मंडळीला आमंत्रित केले जात असून एरोनिका टक्नॉलॉजीचे स्वप्नील शेंडे यांनी ड्रोनच्या तांत्रिक बाबीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवाय ड्रोन शेतीचे फायदेही शेतकऱ्यांना सांगण्यात आले. ड्रोनद्वारे 8 मिनिटांमध्ये 1 एकराचे क्षेत्र फवारणी होणार असल्याने शेतकऱ्यांच्या वेळेत आणि कष्टामध्येही बचत होणार आहे.

खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा

सध्या खरीप हंगामाच्या अनुशंगाने कृषी विभागाची तयारी सुरु झाली आहे. गतवर्षी झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकरी मेळावे पार पडत आहेत. याच दरम्यान उत्पादन वाढीचे धडे दिले जात आहेत. खरीप हंगामात सोयाबीन हे मुख्य पीक असले तरी शेतकऱ्यांनी इतर पिकांवरही भर देऊन उत्पादनवाढीचा सल्ला विभागीय कोरडवाहू संशोधन केंद्र सोलापूरचे सहयोगी प्रा. डॉ.ड़ी.व्ही. इंडी यांनी दिला आहे.

शेतीसाठी ड्रोन वापराण्याची नियमावली

भारतीय शेतीमध्ये आतापर्यंत बरीच प्रगती झाली आहे. शेतकऱ्यांनी संशोधन व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे त्याचा त्यांना फायदा झाला आहे. शेतकरी ठिबक सिंचन आणि विविध प्रकारच्या यंत्रे भारतातील शेतीसाठी वापरली जात आहेत. ड्रोन आता शेतीमध्ये औषध फवारणी करताना महत्त्वाचा ठरणार आहे. ड्रोनमुळे पीक फवारणीसाठी लागणारं मनुष्यबळ नक्कीच कमी होईल. तसेच पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचे प्रमाण ड्रोन वापरण्यापेक्षा कमी होईल. एखाद्याला ड्रोनच्या सहाय्याने आपल्या शेतात फवारणी करायची असेल तर त्याला संबंधित अधिकाऱ्यांना 24 तास अगोदर कळवावे लागणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.