Soybean : मोहरीची साठवणूक अन् फायदा सोयाबीनला, शेतकऱ्यांनी माल रोखण्याचे कारण काय?
यंदा पोषक वातावरणामुळे प्रत्येक पिकांची उत्पादकता ही वाढलेली आहे. काही पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम झालेला आहे. पण उत्पादन पदरी पडले की बाजारपेठत नेण्याची शेतकऱ्यांची लगबग असतेच. पण मोहरीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. सध्या खाद्य तेलाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे असेच दर वाढत राहिले तर भविष्यात दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे.
पुणे : उत्पादन पदरी पडले की लागलीच विक्री न करता (Farmer) शेतकरीही आता बाजारपेठेचा अभ्यास करुनच विक्री की (Mustard Stock) साठवणूक याचा निर्णय घेत आहे. यापूर्वी खरिपातील सोयाबीन आणि कापसाबाबत घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरला होता. त्यावेळी उत्पादनात घट झाल्याने (Summer Crop) दरवाढ होणार हे निश्चित मानले जात होते. आता परस्थिती बदलली आहे. मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनदेखील शेतकरी साठवणूकीवर भर देत आहे. बाजारपेठेत मोहरीला मागणी असून पुरवठा नाही. त्यामुळे नाईलाजास्तव सोयाबीन शिवाय पर्यायच राहणार नाही. त्यामुळे सोयबीनच्या दरात सुधारणा होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करती आहेत.
यामुळे दरढीची अपेक्षा कायम
देशात मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात मोहरीची आवक ही कमी झाली आहे. खाद्य तेलाच्या वाढत्या दराचा हा परिणाम आहे. मोहरीची आज साठवणूक केली तर उद्याला अधिकेचा दर मिळणार याबाबत शेतकरी आशादायी आहे. गतवर्षीही हंगामाच्या सुरवातील 6 हजार 400 रुपये क्विंटल असा मोहरीला दर मिळाला होता. तर शेतकऱ्यांकडून आवक कमी झाली की दर वाढले या बाबी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्या असून आता वाट पाहीन पण अधिकचा भाव घेईल अशी शेतकऱ्यांची धारणा झाली आहे.
उत्पादन वाढूनही आवक घटलेलीच
यंदा पोषक वातावरणामुळे प्रत्येक पिकांची उत्पादकता ही वाढलेली आहे. काही पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम झालेला आहे. पण उत्पादन पदरी पडले की बाजारपेठत नेण्याची शेतकऱ्यांची लगबग असतेच. पण मोहरीच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. सध्या खाद्य तेलाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे असेच दर वाढत राहिले तर भविष्यात दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे. त्यामुळे उत्पादन अधिकचे झाले असले तरी योग्य किंवा मनासारखा दर मिळाला नाही तर मग साठवणूक हाच पर्याय शेतकऱ्यांनी निवडलेला आहे. अशा निर्णयामुळेच कापसाला विक्रमी दर मिळाला तर सोयाबीनला सरासरी एवढा दर मिळालाच की..
पुन्हा सोयाबीन दरवाढीचे संकेत
खाद्य तेलाचे दर वाढतील म्हणून त्याची साठवणूक केली जात आहे तर याचा परिणाम इतर तेलबियांवर होणार आहे. त्यामुळेच भविष्यात मागणीच्या तुलनेत तेल बियांचा पुरवठा न झाल्यास सोयाबीनचे दर पुन्हा वाढतील असे चित्र निर्माण झाले आहे. सध्या सोयाबीनची आवक असूनही दर मात्र 6 हजार 800 पर्यंत आहेत. भविष्यात मागणी वाढली तर दरही वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.