…म्हणून जानेवारी महिन्यातच खोदल्या जातात अधिकतर विहीरी, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर
ज्यापध्दतीने पानाड्याच्या सांगण्यावरुन विहीर किंवा बोअरवेल घेतले जाते त्याचअनुशंगाने जानेवारी महिन्यातच अधिक प्रमाणात विहीरी खोदल्या जातात किंवा कोणत्या भागात विहीर घेतल्यावर पाणी लागणार आहे? याच्या शास्त्रीय पध्दती कोणत्या? याचा देखील अभ्यास करणे महत्वाचे आहे. त्याच अनुशंगाने विहीर खोदण्याच्या पध्दतीची माहिती आपण आज घेणार आहोत.
लातूर : काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागला असला तरी आजही (Drilling wells) विहीर खोदायची म्हटले की, समोर येतो तो पानाड्या. ग्रामीण भागात (Geology ) भुगर्भाचा अभ्यास त्याची शास्त्रशुध्द पध्दती काय याचा विचार न करता थेट पानाड्याला आमंत्रित केले जाते आणि भुगर्भातील पाण्याचा शोध घेतला जातो. यामुळे अनेक ठिकाणी पाणीही लागलेले आहे. या दरम्यान, पानाड्या हा शेतामधील आपट्याचे झाड, शमीचे झाड आहे त्याठिकाणी विहीर खोदली जात होती. एवढेच काय ज्या ठिकाणी चार झाडांचा संगम आहे आशा ठिकाणी ओलसरपणा अधिक असला तरी विहीर खोदली जाते. यामागे कोणतेही शास्त्र नसले तरी ग्रामस्थांची भावना लक्षात घेऊन हा प्रकार वाढलेला आहे. ज्यापध्दतीने पानाड्याच्या सांगण्यावरुन विहीर किंवा (Borewell) बोअरवेल घेतले जाते त्याचअनुशंगाने जानेवारी महिन्यातच अधिक प्रमाणात विहीरी खोदल्या जातात किंवा कोणत्या भागात विहीर घेतल्यावर पाणी लागणार आहे? याच्या शास्त्रीय पध्दती कोणत्या? याचा देखील अभ्यास करणे महत्वाचे आहे. त्याच अनुशंगाने विहीर खोदण्याच्या पध्दतीची माहिती आपण आज घेणार आहोत.
जानेवारी महिन्यातच का खोदल्या जातात विहीरी?
जानेवारी महिन्यातच अधिक विहीरी खोदल्या जातात यामागे एक कारण आहे. पावसाळा संपल्यानंतरचा हा जानेवारी महिना. या महिन्यात पाण्याची पातळी ही फार खोल गेलेली नसते आणि ती उथळही नसते. पावसाळ्यानंतरच्या तीन महिन्यांमध्ये भुगर्भात पाणी मुरण्याची प्रक्रिया थांबलेली असते. पण या प्रक्रियेमुळे भुगर्भ खोदण्यासाठीची क्रिया ही सोपी असते. कारण जमिन ही नरम झालेली असते. त्यामुळे या महिन्यात विहीरीचे खोदकाम सुरु केले तर मार्च-एप्रिल पर्यंत खोदकाम करण्यास सोपे जाते. यासाठी कोणता काळ हा मर्यादीत नाही तर नागरिक हे शुभ मुहुर्त ठरवून विहीरीचे खोदकाम करतात.
विहीर खोदण्यासाठीची जमिन
नैसर्गिकदृष्ट्या ज्या जमिनीमध्ये पाण्याचे संचयन होते अशाच ठिकाणी पाणी लागण्याची शक्यता असते. यामध्ये भेगा असणाऱ्या, सांधे असणाऱ्या दगडांमध्ये किंवा मुरमाचा स्थर असणाऱ्या दगडामध्येच पाणी जास्त मुरते. ज्या ठिकाणी भुजलाचे संचयन असते त्याला शास्त्रीय पध्दतीमध्ये पाण्याचा स्टोरेज झोन असे म्हटले जाते. या पाण्याच्या स्टोरेज असलेल्या जमिनीतच विहीरी खोदण्याचे प्रमाण अधिक असते. अशा ठिकाणी विहीरी घेतल्याने बारमाही पाणी टिकून राहते. विहीर खोदताणा त्या ठिकाणचा दगडाचा प्रकार जो की नरम असावा जास्तीत जास्त खोलीपर्यंत खोदता यावा अशा ठिकाणीच विहीर खोदता येते.
मांजऱ्या दगडामध्ये सच्छिद्रता असते
विहीर खोदताना सर्वात महत्वाचे आहे तो पाण्याचा संचयन क्षेत्र. त्यामुळे विहीरी ह्या आता टेकडीवर घेत नाही तर नाल्या लगत, नदीपासून काही अंतरावर, मऊ खडकामध्येच खोदल्या जातात. त्यामुळे अधिक काळ पाणी टिकून राहते. भुजलधारक खडकाची जाडी आणि रुंदी अधिक असल्यास
कोणत्या भूस्तर रचनेमध्ये अधिक पाणी लागते?
पाण्याचे संचनयन ज्या भागात होते त्या ठिकाणीच अधिकचे पाणा लागते. विशेषत: मुरमाड खडक जर अधिक खोलवर असेल तर त्या भागातच अधिकचे पाणी लागते. कठीण पाशान खडकात पाणी लागत नाही. काळ्या मातीचा थर असले भुजलपुनर्भरही कमी होते आणि मिळतेही कमीच. त्यामुळे भुस्तर रचना नरम खडक, मुरुमयुक्त असल्यास अधिक फायदा होतो. एकंदरीत मांजऱ्या असलेल्या खडकाळ भागात पाणी अधिक संचयन केले जाते त्या क्षेत्रावर पाणी लागते.
जमिनीतील खडकावरच सर्वकाही अवलंबून
विहिरींना होणारा पाणीपुरवठा हा जमिनीखालील खडकांच्या प्रकारावर व त्यांच्या रचनेवर अवलंबून असतो. सच्छिद्र व पुष्कळ संधी किंवा भेगा असलेल्या खडकांतून पुष्कळ पाणीपुरवठा होणे शक्य असते. अग्निज व रूपांतरित खडक सामन्यतः छिद्रहीन असतात. त्यांच्यात संधी किंवा भेगा थोड्याच असतात. म्हणून त्यांच्यामधून पाणीपुरवठा कमी होतो. जाड वाळू व कंकर असलेल्या जमिनीमधील विहिरींना भरपूर पाणीपुरवठा होऊ शकतो. चिकण मातीतील विहिरींना फारच अल्प प्रमाणात पाणी उपल्बध होते. (डॉ. बी.एन. संगणवार जिल्हा वरीष्ठ भुवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे केलेली बातमी)
संबंधित बातम्या :
‘महाबीज’मुळे रखडला उन्हाळी सोयाबीनचा पेरा, अगोदर प्रोत्साहन आता अडवणूक, काय आहे नेमका प्रकार?
तरुणांसाठी प्रेरणादायी : शेतकरी उत्पादक कंपनीची घोडदौड, शेतीमालाच्या निर्यातीमधून उद्योग उभारणी
ऊस उत्पादकांचा प्रश्न निकाली, 6 ऊसतोड टोळ्या नव्याने दाखल, कन्नड कारखान्यात कसे झाले परिवर्तन?