युद्धाच्या आगीनं सोयाबीनला हवा, दर उच्चांकी स्तरावर, विक्री करावी की साठवणूक? प्रश्न कायम

सोयाबीनचे घटलेले उत्पादन, वाढलेली मागणी आणि यातच आता रशिया-युक्रेनमुळे ओढावलेली परस्थितीमुळे या सर्व बाबींमुळे सोयाबीनला हंगामाच्या अंतिम टप्प्यात अच्छे दिन आले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये सोयाबीनचे दर असे काय बदलले आहेत यावर शेतकऱ्यांचाच काय व्यापाऱ्यांचा देखील विश्वास बसत नव्हता. मध्यंतरी शनिवारचे दर वगळता सोयाबीनच्या दरात वाढच होत आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये व्यवहार झाले नसले तरी प्रक्रिया उद्योगावरुन सोयाबीनचे दर हे चढेच राहणार असल्याचे चित्र आहे.

युद्धाच्या आगीनं सोयाबीनला हवा, दर उच्चांकी स्तरावर, विक्री करावी की साठवणूक? प्रश्न कायम
सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योग उभारले जाणार असल्याने दरात सुधारणा राहणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 1:58 PM

लातूर : सोयाबीनचे घटलेले उत्पादन, वाढलेली मागणी आणि यातच आता रशिया-युक्रेनमुळे ओढावलेली परस्थितीमुळे या सर्व बाबींमुळे सोयाबीनला हंगामाच्या अंतिम टप्प्यात अच्छे दिन आले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये (Soybean Rate) सोयाबीनचे दर असे काय बदलले आहेत यावर शेतकऱ्यांचाच काय व्यापाऱ्यांचा देखील विश्वास बसत नव्हता. मध्यंतरी शनिवारचे दर वगळता सोयाबीनच्या दरात वाढच होत आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये व्यवहार झाले नसले तरी (process industry) प्रक्रिया उद्योगावरुन सोयाबीनचे दर हे चढेच राहणार असल्याचे चित्र आहे. कारण लातूर येथील प्रक्रिया उद्योजकांनी मंगळवारी सोयाबीनची खरेदी हे तब्बल 7 हजार 700 रुपये क्विंटलप्रमाणे केली आहे. तर दुसरीकडे अर्जेंटिना रशिया आणि युक्रेन येथून सुर्यफुलाचे (edible oil import) तेल आयात ठप्प झाली आहे. परिणामी तेलासाठी देशांतर्गत बाजारातील सोयाबीनची मागणी वाढली आहे. याचाच परिणाम दरावरही होताना दिसत आहे.सध्या सोयाबीनला हंगामातील उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात दरात वाढ होणार की घटणार यामुळे विक्रीबाबत शेतकरी हे संभ्रम अवस्थेत आहेत.

उत्पादन घटले मात्र, वाढीव दराने शेतकऱ्यांना तारले

खरीप हंगामातील सोयाबीन जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोयाबीन हेच मुख्य पीक असल्याने झालेले नुकसान कसे भरुन काढावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतानाच हंगामाच्या सुरवातीला दरही कवडीमोल मिळाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी वाढीव दर मिळाल्याशिवाय विक्री नाही ही भूमिका घेतल्यानेच आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला विक्रमी दर मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेली दराची घोडदौड अजूनही कायम आहे.

आता पर्याय सोयाबीनचाच

नाही म्हणलं तरी सोयाबीनच्या दरावर युध्दजन्य परस्थितीचा परिणाम हा होत आहे. कारण रशिया आणि युक्रेनसह अर्जेंटिना येथून सुर्यफूलसह इतर तेलाची भारतामध्ये आयात केली जाते. हा आयात आता ठप्प आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योजकांना आता सोयाबीन शिवाय पर्यायच उरलेला नाही. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत वाढ होत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात आणि शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक असताना या गोष्टी घडून आल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट दर, निर्णय शेतकऱ्यांचा

हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना दर हे वाढलेले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे दर हे दुप्पट झाले आहेत. मात्र, सध्या अस्थिर दरामुळे आणि य़ुध्दजन्य परस्थितीचा अणखी किती परिणाम होणार यामुळे साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न कायम आहे. पण 7 हजार 500 हा दर चांगला असून अधिकचे नुकसान न होऊ देता या दरात शेतकऱ्यांनी विक्रीलाच प्राधान्य देण्याचा सल्ला व्यापारी देत आहेत.

संबंधित बातम्या :

Mango : जीआय मानांकन हापूसला हक्काचे मार्केट, खरेदी केंद्राची उभारणी अन् विक्रीही

PM Kisan Yojna : आता बॅंक खाते क्रमांकाची सक्ती नाही, मग काय आहे नवीन पर्याय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी

Latur : शेतकऱ्यांचा हाबाडा अन् पीकविम्याबाबत आश्वासन नव्हे थेट तोडगाच, लातुरात नेमके झाले काय?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.