AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकांमधील कीड व्यवस्थापनात पिवळ्या अन् निळ्या चिकट सापळ्यांची काय भूमिका?

रसशोषक किडी पिकातील हरितद्रव्य शोषून घेतात त्यामुळे पिकाची आंतरिक प्रक्रिया खालावून किट इतर रोगांना बळी पडते. तसेच पांढरी माशी,मावा,थ्रीप्स, हे कीटक विषाणूजन्य रोगांचे वाहक म्हणून काम करतात. त्यामुळे विषाणूजनीत रोग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. हे विषाणूजन्य रोग पिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यानंतर पिकात शिरकाव करतात. बरेच कीटक आपल्या स्वजातीयांशी संबंध किंवा संपर्क आणि सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडत असतात.

पिकांमधील कीड व्यवस्थापनात पिवळ्या अन् निळ्या चिकट सापळ्यांची काय भूमिका?
पिकांमध्ये पिवळे आणि निळे सापळे उभारले तर मात्र किडीपासून पिकांचे संरक्षण होते.
| Updated on: Mar 06, 2022 | 5:06 AM
Share

लातूर :  (Succulent Insect) रसशोषक किडी पिकातील हरितद्रव्य शोषून घेतात त्यामुळे पिकाची आंतरिक प्रक्रिया खालावून किट इतर रोगांना बळी पडते. तसेच पांढरी माशी, मावा, थ्रीप्स, हे कीटक (Carriers of viral diseases) विषाणूजन्य रोगांचे वाहक म्हणून काम करतात. त्यामुळे विषाणूजनीत रोग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. हे विषाणूजन्य रोग पिकाची (Immune system) रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यानंतर पिकात शिरकाव करतात. बरेच कीटक आपल्या स्वजातीयांशी संबंध किंवा संपर्क आणि सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडत असतात. यालाच कामगंध किंवा फेरोमोन असे म्हणतात. वेगवेगळ्या किडींचा कीटकांचा कामगंध हा वेगवेगळा असतो. लिंगविषयक कामगंधामुळे कीटक एकमेकांकडे आकर्षित होतात व समागमासाठी योग्य उमेदवार मिळवू शकतात. काही कीटकांमध्ये मादी कीटक नराला तरी काहींमध्ये नर कीटक मादीला आकर्षित करण्यासाठी त्याच्या शरीरातून विशिष्ट कामगंध सोडतात.

अशाप्रकारे किडींवर नियंत्रण मिळवता येते

किडींचे प्रमाण अत्यल्प असते, अशा वेळी पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळ्यांचा चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी जास्त प्रमाणात कामगंध सापळे बसवल्यास मोठ्या प्रमाणात पतंग पकडले जाऊन परिणामी पुढील प्रजनन कमी करण्यास मदत होते. यामुळे कीटकांच्या मीलनास अडथळा आणणारे लिंग प्रलोभन रासायनाचे कण वातावरणात सोडल्यामुळे मीलनासाठी किडींना आपला जोडीदार शोधणे कठीण जाते. जोडीदाराचा संदेश व वातावरणातील कृत्रिम रसायनांच्या संदेशामधील फरक कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो. त्यामुळे त्यांचे मीलन होत नाही आणि पुढील पिढी जन्माला येत नाही. अशा प्रकारे किडींच्या संख्येत लक्षणीय घट होते.

पिवळे अन् निळे सापळे

पीकाच्या सुरवाती पासून जेव्हा आपण पिवळे व निळे चिकट सापळे लावतो तेव्हा मावा,तुडतुडे,पांढरी माशी,थ्रीप्स यांचा बंदोबस्त करत असतो. तसेच विषाणूजन्य रोग पिकामध्ये पसरवन्या पासून रोखले जातात. त्यासाठी होणारा कीटकनाशकांवरील फवारणी खर्च वाचतो.त्यामुळे पिवळे व निळे चिकट सापळे किट व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावतात.

असा होतो किडीचा प्रसार

एकरी किमान 30 ते 40 चिकट सापळे लावले जातात. सर्व पिकामध्ये आपण या सापळ्यांचा वापर करू शकतो. एखाद्यावेळी कांद्यासारख्या पिकामध्ये फुलकिड्यांचा(थ्रीप्स) नियंत्रणासाठी 60 ते 80 निळे चिकट सापळे लावावे लागतात. यामुळे किंड्यांना आकर्षित करतात. यामुळे किडींचा फैलाव होत नाही. परिणामी एका झाडावरुन दुसऱ्या झाडाकडे किडे मार्गस्थ होत नसल्याने प्रादुर्भाव रोखला जातो.जेव्हा रसशोषक कीड जसे पांढरी माशी एखाद्या रोगग्रस्त झाडातील रस शोषते आणि तीच माशी पुन्हा उडत जाऊन नवीन निरोगी झाडातील रस शोषते तेव्हा विषाणू हा रोगी झाडाकडून निरोगी झाडाकडे संक्रमित होतो. हे सर्व काही मिनिटामध्ये घडत असते त्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.

सदरील बातमी ही लेखक महेश कदम यांच्य़ा लेखाच्या अधारे केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्याच्या सल्ल्याने सापळे उभा करावेत

संबंधित बातम्या :

Onion : कांदा दराचा लहरीपणा, आठ दिवसांमध्ये असे काय दर घसरले की शेतकऱ्यांचेच नव्हे व्यापाऱ्यांचेही गणित हुकले..!

Latur Market : सोयाबीन दोन दिवस स्थिरवाल्यानंतर पुन्हा दरात घसरण, तुरीला मात्र हमीभावाप्रमाणे दर

Rabi Season : वावरातलं पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे ढग कायम

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.