Chickpea : मुदतीपूर्वीच हरभरा खरेदी केंद्र बंद, राज्यातील हरभऱ्याची स्थिती काय?

राज्यात यंदा हरभऱ्याची उत्पादकता वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ती हरभरा केंद्राची. 1 मार्चपासून हरभरा खरेदी केंद्र सुरुही झाली पण सातत्याने बारदाणाच्या आभाव, साठवणूकीची समस्या यामुळे नियमित सुरु राहिली नाही. परिणामी खरेदीला दिरंगाई झाली. 29 मे पर्यंत राज्यातील खरेदी केंद्र ही सुरु राहणार होती. पण 23 मे रोजीच अचानक खरेदी बंद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे खरेदी केंद्राहबाहेर असलेल्या शेतकऱ्यांचा देखील माल घेतला गेला नाही.

Chickpea : मुदतीपूर्वीच हरभरा खरेदी केंद्र बंद, राज्यातील हरभऱ्याची स्थिती काय?
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 2:44 PM

पुणे : ‘नाफेड’च्या माध्यमातून सुरु करण्याता अलेली हरभरा खरेदी यंदा मुदतीपूर्वीच बंद झाली आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या मागणीनंतर पुन्हा सुरु झालेली ही केंद्र अवघ्या दोन दिवसांमध्ये बंद झाल्याने (Chickpea Crop) हरभरा उत्पादकांची मोठी अडचण झाली आहे. राज्यभरातील 5 लाख शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र, ठरवून देण्यात आलेल्या वेळेपूर्वीच ही (Shopping Center) खरेदी केंद्र बंद झाल्याने 1 लाख शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे करायाचे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. 29 मे रोजी बंद होणारी ही केंद्र 23 मे रोजी अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांनी करावे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत ना (State Government) राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले आहे ना संबंधित यंत्रणेने. त्यामुळे उत्पादन वाढूनही शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.

खरेदी केंद्रांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर

राज्यात यंदा हरभऱ्याची उत्पादकता वाढली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ती हरभरा केंद्राची. 1 मार्चपासून हरभरा खरेदी केंद्र सुरुही झाली पण सातत्याने बारदाणाच्या आभाव, साठवणूकीची समस्या यामुळे नियमित सुरु राहिली नाही. परिणामी खरेदीला दिरंगाई झाली. 29 मे पर्यंत राज्यातील खरेदी केंद्र ही सुरु राहणार होती. पण 23 मे रोजीच अचानक खरेदी बंद झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे खरेदी केंद्राहबाहेर असलेल्या शेतकऱ्यांचा देखील माल घेतला गेला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांची मागणी आणि होणारी गैरसोय पाहता 17 मे पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांचीच खऱेदी असा निर्णय झाला. मात्र, तसे न होता दोनच दिवसांमध्ये खरेदी केंद्र ही बंद झाली आहेत. त्यामुळे खरेदी केंद्राच्या बदलत्या धोरणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

नोंदणी करुनही विक्री नाही

खरेदी केंद्रावर पिकाची विक्री करण्यासाठी आगोदर नोंदणी आवश्यक असते. त्यामुळे राज्यभरातील 5 लाख शेतकऱ्यांनी अधिकृत नोंदणीही केली. पण 1 लाख 10 हजार शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्यापूर्वीच राज्यातील खरेदी केंद्र ही बंद झाली. त्यामुळे नोंदणी करुनही आता या शेतकऱ्यांना कवडीमोल दरात खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याची विक्री करावी लागणार आहे. तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे त्याबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा

अन्यथा फरक रक्कम अदा करावी

हरभरा खरेदी केंद्रावर 5 हजार 230 असा दर ठरवून देण्यात आला होता. खुल्या बाजारपेठेपेक्षा प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना 900 रुपये अधिकचा दर मिळत होता. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत त्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 900 रुपये फरक देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. मात्र, खरेदी केंद्र बंद केल्यापासून नाफेडने आतापर्यंत भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी नेमके करावे काय असा सवाल आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.