PM Kisan : कशामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

पीएम किसान सन्मान योजना सुरु करावी अशी मागणी सरकारकडे कुणी केलीच नव्हती. मात्र, देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांची परस्थिती पाहूनच हा निर्णय घेण्यात आला होता. आता या योजनेमुळे शेती व्यवसयासाठी आवश्यक पायाभूत बाबी अल्पभुधारक शेतकऱ्यांना घेता येत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

PM Kisan : कशामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 3:11 PM

मुंबई : देशभरात 86 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यांना पायाभूत सोईसुविधा मिळाव्यात त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा हेच केंद्र सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा निर्धारच केंद्र सरकारने केलेला आहे. ( PM Kisan Samman Nidhi Yojana) पीएम किसान सन्मान योजना सुरु करावी अशी मागणी (Central Government) सरकारकडे कुणी केलीच नव्हती. मात्र, देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांची परस्थिती पाहूनच हा निर्णय घेण्यात आला होता. आता या योजनेमुळे शेती व्यवसयासाठी आवश्यक पायाभूत बाबी अल्पभुधारक शेतकऱ्यांना घेता येत असल्याचेही (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. शनिवारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना त्यांनी हे सांगितले आहे. देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे.

ही अशी पहिलीच योजना

आतापर्यंत अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. पण पीएम किसान सन्मान योजना ही एक अशी योजना आहे की, ज्यामधून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. ना कोणी मध्यस्ती ना कोणती कपात थेट आर्थिक लाभ मिळवून देणारी ही पहिलीच य़ोजना असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 1 लाख 80 हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत शिवाय यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडलेला नाही हे विशेष. यामुळे शेतकऱ्यांना सरकारप्रती अधिक विश्वास दृढ होत आहे. शेतकऱ्यांच्या हीताच्या अनुशंगाने होत असलेल्या निर्णयाचा थेट फायदा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे.

या धनराशीचा योग्य वापर

ही योजना अल्पभुधारक शेतकरीच केंद्रस्थानी ठेऊन सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे वर्षभराच्या या रकमेतून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, अवजारे तसेच शेती मधील इतर कामे करण्यास या निधीचा वापर होत आहे. केंद्र सरकाच्या निधीचा थेट लाभ शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर होत असल्याने याचे मोठे समाधान असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभुधारक शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा उद्देश साध्य होत असल्याचेही यावेळी मोदी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

FPO : पंतप्रधान मोदींनीच सांगितले शेतकरी उत्पादक कंपनीचे 5 बलस्थाने, वाचा सविस्तर

एरंडोल बाजार समितीच्या एका निर्णय अन् शेतकऱ्यांच्या दोन शेती पिकांचा फायदा, वाचा सविसतर

नववर्षाची सुरवात शेतकरी हीताच्या निर्णयाने : पीएम किसानचा हप्ता जारी, अन् शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.