Banana : केळी निर्यात लांबणीवर, आता दरावर काय होणार परिणाम?
केळीचा हंगाम सुरु होताच दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. असे असले तरी आता निर्यातीमध्ये अडचण निर्माण झाल्याने याचा दरावर काय परिणाम याची धास्ती केळी उत्पादकांना आहे. वातावरणातील बदलाचा केळीचे नुकसान झाले आहे. यातच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने निर्यातीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. पण याचा केळी दरावर परिणाम होणार नसल्याचे निर्यातीदारांकडून सांगण्यात आले आहे.
जळगाव : (Banana Season)केळीचा हंगाम सुरु होताच दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. असे असले तरी आता निर्यातीमध्ये अडचण निर्माण झाल्याने याचा दरावर काय परिणाम याची धास्ती केळी उत्पादकांना आहे. वातावरणातील बदलाचा केळीचे नुकसान झाले आहे. यातच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने (Banana Export) निर्यातीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. पण याचा केळी (Banana Rate) दरावर परिणाम होणार नसल्याचे निर्यातीदारांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा वातावरणातील बदल आणि अंतिम टप्प्यात वाढेलेली थंडी यामुळे दराबाबत साशंका निर्माण होत होती पण आता वाढत्या तापमानामुळे दरात वाढ होत आहे तर दुसरीकडे केळी पिकवण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याने निर्यात ही महिनाभर लांबणीवर पडणार आहे.
खानदेशात केळीवर करप्याचा प्रादुर्भाव
निसर्गाच्या लहरीपणाचा फळपिकांवरच अधिक झाला आहे. हंगामातील पिकांचे तर नुकसान झाले पण गेल्या अनेक वर्षापासून बागांची जोपासणा करुनही अंतिम टप्प्याते नुकासनीचा सामना करावा लागत आहे. हे कमी म्हणून की काय ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला होता. त्यामुळे जालना, औरंगाबाद जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी बागांची मोडणी केली होती. या नैसर्गिक समस्यांचा सामना करुनही केळीच्या काढणीला सुरवात झाली आहे. पण बागांना चिलिंग म्हणजेच काळे डाग लागल्याने निर्यातीमध्ये अडचण निर्माण होत आहे.
महिन्याभराने निर्यात लांबणीवर
थंडी कमी होताच केळीच्या दरात सुधारणा होऊ लागली होती. 400 ते 600 रुपये क्विंटल दराने केळीला मागणी होती. मध्यंतरीच्या वाढत्या दरामुळे हा परिणाम झाला होता. पण फेब्रुवारी महिना उजाडताच उन्हामध्ये वाढ सुरु झाली आणि दरात सुधारणा होऊ लागली होती. 400 ते 600 रुपयांवरील केळी थेट 1 हजार रुपये क्विंटलवर पोहचलेली आहे. त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून निर्यात होईल अशी अपेक्षा होती पण केळी बागांना चिलिंग इंज्युरीने ग्रासलेले आहे. त्यामुळे आता 15 मार्चपासून निर्यात होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. असे असले तरी दरावर त्याचा परिणाम होणार नाही.
कमी कालावधीत अधिकची निर्यात
यंदा महिन्याभराने केळीची निर्यात लांबणीवर पडणार असली तरी त्याचा दरावर परिणाम होणार नाही. मागणीत वाढ असल्याने ही परिणाम दिसून येणार नाही. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत झाल्याने निर्यातीमधील अडचणी दूर झाली आहे. त्यामुळे जळगावमधील रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर या भागातील केळी दर्जेदार असल्याने कमी कालावधीत अधिक निर्यात होईल असा अंदाज आहे.
संबंधित बातम्या :
Success Story : शेती व्यवसयात आयुर्वेदिक औषध कंपनीची मदत, करार शेतीतून चित्रंच पालटले..!
Soybean Rate : आता उलटी गिनती सुरु..! आठ दिवसांमध्ये घडले अन् एका रात्रीतून बिघडले