Intercropping : उत्पादन वाढीसाठी कायपण? ऊसतोडणी होताच शेतकऱ्यांची भन्नाट Idea..!
पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्यावर शेती व्यवसायात काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय यंदाच्या उन्हाळी हंगामात येऊ लागला आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पारंपरिक पिकांवर भर न देता कडधान्याचा अधिकचा पेरा केला आहे. आता ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असला तरी ज्या भागातील ऊसतोड झाली आहे तिथे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी भन्नाट आयडीया राबवली आहे.
लातूर : पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्यावर शेती व्यवसायात काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय यंदाच्या (Summer Season) उन्हाळी हंगामात येऊ लागला आहे. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी (Rabi Season) रब्बी हंगामात पारंपरिक पिकांवर भर न देता कडधान्याचा अधिकचा पेरा केला आहे. आता ऊसगाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असला तरी ज्या भागातील ऊसतोड झाली आहे तिथे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी भन्नाट आयडीया राबवली आहे. तोडणी होताच (Intercropping) आंतरपिक म्हणून ऊसाच्या सरीमध्ये उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. जिल्ह्यातील विविध भागात हा प्रयोग राबवला जात असल्याचे उपविभागीय कृषी राजेंद्र कदम यांनी सांगितले आहे. यामुळे वेळेचा सदउपयोग तर होईलच पण आंतरपिकातून शेतकऱ्यांच्या पदरी उत्पन्नही पडेल.
ऊसतोड होताच मशागत अन् पेरा
यंदा ऊसतोडणीला उशिर झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढावले होते. मात्र, याच संकटाचे संधीत रुपांतर केले जात आहे. ऊसतोड होताच या क्षेत्रातील सऱ्या रिकाम्या होतात. वेळेत बचत व्हावी म्हणून ट्रक्टरच्या सहायाने मशागत करुन सोयाबीनचे पीक घेतले जात आहे. उन्हाळी हंगामातील सोयाबीनच्या पेरणीला उशिर झाला असला तरी सोयाबीन उत्पादनाला कोणताही धोका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरच पडणार आहे. शिवाय सध्या सोयाबीनचे दर टिकून आहेत तसेच या पेऱ्यामुळे खरिपातील बियाणाचीही चिंता मिटणार आहे.
आंतरपिकाचा नेमका फायदा काय?
ऊसाची लागवड ही रुंद सरी वरंबा पद्धतीनेच होत असते. त्यामुळे ऊसाच्या दोन सरीमध्ये 7 ते 8 फुटाचे अंतर हे रहातेच. याच सरीमध्ये मशागत करुन सोयाबीनचा पेरा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकाच वेळी दुहेरी उत्पादन घेता येते. शिवाय ऊस बहरात येत असतानाच सोयाबीन काढणीला येते. शिवाय यासाठी वेगळे असे काहीच नाही. ऊसाची मशागत करीत असताना हे पीक सहज घेता येते म्हणून शेतकरी हा प्रयोग करीत आहेत.
हरभऱ्याऐवजी सोयाबीनला पसंती
उन्हाळी हंगामात हरभऱ्याचा विक्रमी पेरा झाला आहे. शिवाय आता हरभऱ्याचे उत्पादन घेतल्यास काढणीला उशिर होणार आहे. उन्हाळी हंगामातही वातावरण बदलीचे सत्र हे सुरुच आहे. कधी ऊन्हाचा चटका तर कधी ढगाळ वातावरण याचा सर्वाधिक परिणाम हरभऱ्यावर होतो. त्यामुळे हरभऱ्याऐवजी शेतकरी हे सोयाबीनला अधिकची पसंती देत आहेत. सोयाबीन हे केवळ खरिपापुरते मर्यादीत राहिलेले पीक नाही तर उन्हाळी हंगामातही याचा पेरा हा वाढत आहे.
संबंधित बातम्या :
Drone Farming: आधुनिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड, कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना अनोखे Gift
Mango Damage : अगोदर अवकाळी आता वाढतं ऊन, आंबा उत्पादकांची उरली-सुरली आशाही मावळली..!