धुळे जिल्ह्यातला पांढरा कांदा थेट दुबईला, चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आनंदात
धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उत्तम प्रतीचा कांदा उत्पादीत केला, तर तो थेट दुबईला पाठवता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्तम कडा उत्पदाणाकडे लक्ष देण्याचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.
धुळे : नाशिक (Nashik farmer) जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्याय होतो. पण आता कांदा निर्यातीमध्ये धुळे (dhule farmer) जिल्ह्यानेही आघाडी घेतली आहे. धुळे तालुक्यातील कांदा थेट दुबईला (dubai) निर्यात करण्यात येत आहे. दोन कंटेनर भरून कांदा दुबईकडे रवाना कारण्यात आला. धुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा उत्पादीत केल्याने त्याची थेट निर्यात होत आहे. खानदेशातून पहिल्यांदाच थेट दुबई येथे कांदा निर्यात झाला आहे. प्रताप महलेब खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीतून सफेद कांदा हा थेट दुबईत निर्यात होत आहे. विशेष म्हणजे हा कांदा धुळ्यात एसी कंटेनरने सुमारे 29 टन कांदा दुबई कडे रवाना झाला. या कांद्याला चांगला भाव मिळाला असून यापुढे देखील सफेद कांद्याची निर्यात केली जाणार आहे.
धुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उत्तम प्रतीचा कांदा उत्पादीत केला, तर तो थेट दुबईला पाठवता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्तम कडा उत्पदाणाकडे लक्ष देण्याचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे. यापूर्वी देखील धुळे शहरातून कांदा विदेशात गेला आहे. मात्र तो लहान गाड्यांद्वारे मुंबईला आणि तेथून तो व्यापाऱ्यांमार्फत इतर देशात पाठवला जात असतो. मात्र पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीत एसी कंटेनरने हा कांदा थेट दुबईला गेला.
अहमदनगर जिल्ह्यात भाव कोसळल्याने हवालदिल शेतकऱ्याने पाहा काय केलं
कांद्याची आवक वाढल्याने दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील शेतकरी धनंजय थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कांदा पिकावर अक्षरशः ट्रॅक्टर फिरवला आहे. धनंजय थोरात यांनी या कांदा पिकासाठी आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये खर्च केला होता. मात्र कांदा काढणीला आला असतानाच अचानक कांद्याचे भाव कोसळले. खर्चही निघणार नसल्याने हवालदिल झालेल्या थोरात यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात काढणीला आलेल्या कांदा पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे. तसेच कोणीही या, मोफत कांदा उपटून घेऊन जा आणि रान मोकळे करून द्या अशी म्हणण्याची नामुष्की या शेतकऱ्यावर ओढवली आहे. त्यामुळे थोरात यांच्या शेतात कांद्याची पात खाण्यासाठी शेळ्या-मेंढ्या आणि कांदा नेण्यासाठी माणसांची झुंबड उडाली होती. एरव्ही गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणनारा कांदा भाव कोसळल्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.