चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील चिखमारा येथील रामदास नेताम हे जानावरे चारण्यासाठी तांबेगडी (Forest Area) वनक्षेत्रात गेले होते. बरं हे काही त्यांच्यासाठी नवे नव्हते. आता पावसानेही उघडीप दिल्याने ते जनावरे चारण्यासाठी याच वनक्षेत्रात जात होते. मात्र, शनिवारी सकाळी (Animals) जनावरे घेऊन गेलेले रामदास हे रात्रीही परतलेच नाही. रात्री उशीरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबियांच्या मनात शंकेचे वादळ निर्माण झालेच पण त्यांनी कशीबशी रात्र काढली आणि रविवारी सकाळी शोध मोहिम सुरु झाली. तर तांबेगडी वनक्षेत्रातच त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. (Wild Animal Attack) वन्यप्राण्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील प्रक्रिया ही सुरु आहे.
सिंदेवाही तालुक्यातील तांबेगडी येथील वनक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. असे असताना देखील याच भागात जनावरे चारण्यासाठी गुराखी दाखल होत असतात. वनविभागाकडून सातत्याने सावधानतेचा इशारा दिल्यानंतर देखील शेतकऱ्यांचा वावर हा वाढत आहेत. रामदास नेताम हे याचाच शिकार झाले असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांवरील हल्ल्याचे प्रमाण हे वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानता बाळगावी असे आवाहन केले जात आहे.
चिखमारा येथील रामदास नेताम (55) हे जंगलात नेहमीप्रमाणे गुरे राखण्यासाठी गेले होते. मात्र, काल रात्री ते परत न आल्याने सकाळपासून शोध मोहिम सुरु झाली होती. दरम्यान, वनविभागाचे पथक हे शोध घेत असताना त्यांचा मृतदेह हा आढळून आला. त्याचा मृत्यू कोणत्या वन्यजीवांच्या हल्ल्यात झाला याची मात्र निश्चिती नाही, वनपथक घटनास्थळी पोहोचले असून प्राथमिक चौकशीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.
सध्या पावसाळा सुरु असून वनक्षेत्रात प्राण्यांचा वावर वाढला आहे. क्षेत्रा लगतच्या अनेक गावातून गुराखी हे जंगालात येतात मात्र, त्यांच्या जीवाला कायम धोका आहे. घनदाट जंगल झाल्याने पुन्हा शोध मोहिमेतही अडचणी निर्माण होतात. शिवाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाचे अधिकारी यांनी केले आहे.