Kharif : हिवरे बाजार शिवारात खरिपाची उत्पादकता वाढणार, पेरणीपूर्वीच्या उपक्रमाने गाव उद्दिष्ट साधणार?

बीजप्रक्रिया करुनच पेरणी केल्यावर उत्पादनात वाढ होते मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हिवरे बाजार ग्रामपंचायत राष्ट्रीय केमिकल अॅंड फर्टिलायझर लि. च्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याकरिता आता ऑनलाईन बीजप्रक्रिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Kharif : हिवरे बाजार शिवारात खरिपाची उत्पादकता वाढणार, पेरणीपूर्वीच्या उपक्रमाने गाव उद्दिष्ट साधणार?
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 12:32 PM

नगर : जिल्ह्यातील (Hiware Bajar) हिवरे बाजार हे एक आदर्श गाव म्हणून ओळखले तर जातेच पण या गावचे वेगवेगळे उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. सध्या (Kharif Season) खरीप हंगामाची लगबग ही सर्वत्रच सुरु आहे. मात्र, ती बियाणे कोणते घ्यावे, कोणत्या बियाणाने अधिकचा उतारा मिळेल याची पण हिवरे बाजारात वेगळ्याच उपक्रमाची चर्चा सुरुयं. गावातील शेतकऱ्यांनी बियाणे (Seed Processing) बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरायचेच नाही असा निर्धारच करण्यात आला आहे. यंदाची पेरणी ही शंभर टक्के बीजप्रक्रिया करुन केली जाणार असल्याचे राज्य आदर्श गाव विकास समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवाय यांनी सांगितले आहे. उत्पादन वाढीसाठी ही प्रक्रिया महत्वाची असून अख्ख्या गावाने यामध्ये सहभार होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ऑनलाईन बीजप्रक्रिया स्पर्धा

बीजप्रक्रिया करुनच पेरणी केल्यावर उत्पादनात वाढ होते मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हिवरे बाजार ग्रामपंचायत राष्ट्रीय केमिकल अॅंड फर्टिलायझर लि. च्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याकरिता आता ऑनलाईन बीजप्रक्रिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे बीजप्रक्रियेची माहितीही शेतकऱ्यांना मिळणार असून शेतामधूनही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

बीजप्रक्रियेत 100 टक्के शेतकऱ्यांचा सहभाग

ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने एक ना अनेक उपक्रम हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवले जातात. त्याच अनुशंगाने यंदा पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया किती महत्वाची आहे हे पटवून दिले जाणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2022 मध्ये आयोजित ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांचा यामध्ये सहभाग वाढत आहे.

हे सुद्धा वाचा

बीजप्रक्रियेने नेमका काय फायदा होतो?

बियाणे पेरणीपूर्वी बियाण्याच्या पृष्ठभागावर जिवाणू खताची प्रक्रिया केली जाते. यामुळे बियाण्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्मजीव आपोआप जमिनीच्या संपर्कात येतात. बियाण्याची उगवण होताच सदरचे सुक्ष्मजीव मुळांच्या संपर्कात येतात येतात आणि आपले कार्य सुरु करतात. जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थावर जिवाणू नैसर्गिकरीत्या वाढून मुळाभोवती पृष्ठभाग व्यापून टाकतात. त्यामुळे उगवणीनंतर फुलोऱ्यापर्यंत सर्व अवस्थांमध्ये सदर उपकारक सूक्ष्मजीव मूळाभोवती कार्यरत राहून पीक पोषणासाठी उपयुक्त ठरतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.