Abdul Sattar : ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ कृषीमंत्र्यांच्या अनोख्या उपक्रमाने मिटतील का शेतकऱ्यांचे प्रश्न, 1 सप्टेंबरपासून सुरवात

राज्य सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी आत्महत्या हा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राज्यात शेतकरी आत्महत्या होणार ना्हीत, यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील राज्यभर शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या काय ते जाणून घेणार आहेत.

Abdul Sattar : 'एक दिवस शेतकऱ्यांसोबत' कृषीमंत्र्यांच्या अनोख्या उपक्रमाने मिटतील का शेतकऱ्यांचे प्रश्न, 1 सप्टेंबरपासून सुरवात
कृषीमंत्री अब्दुल सत्तारImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 2:26 PM

मुंबई : शेतकऱ्यांचे (Double Increase Income) उत्पन्न दुपटीने वाढावे यासाठी (Government) केंद्र आणि राज्य सरकारदेखील विविध योजनी राबवत आहे. शिवाय शेती व्यवसायात आधुनिकीकरण असावे यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. पण निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेचा आभाव यामुळे हंगामाच्या शेवटी नुकसान हे ठरलेलेच आहे. परिणामी नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र हे सुरुच आहे. ही परस्थिती बदलण्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. माझा एक दिवस शेतकऱ्यांसोबत या अभिनव उपक्रमाअंतर्गत (Abdul Sattar) राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे राज्यभर दौरा करणार आहेत. एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्याच्या समस्या जाणून घेणार आहेत. तर आत्महत्येचे नेमके कारण काय याचाही आढावा घेतला जाणार आहे. शिंदे सरकारची स्थापना होताच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योग्य ते पाऊल उचलले जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानुसार राज्य सरकारचा हा पहिलाच उपक्रम आहे.

100 दिवस शेतकऱ्यांबरोबर राहणार मंत्री

राज्य सरकारच्या अजेंड्यावर शेतकरी आत्महत्या हा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राज्यात शेतकरी आत्महत्या होणार ना्हीत, यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार राज्यातील वेगवेगळ्या भागात कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील राज्यभर शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या काय ते जाणून घेणार आहेत. 100 दिवस हा अनोखा उपक्रम असून यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून उपाययोजना

राज्य सरकारच्या या 100 दिवसांच्या उपक्रमात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. यामध्ये लहानात-लहान बाबदेखील शेतकऱ्यांना शेअर करता येणार. राज्याचे कृषिमंत्रीच या प्रवासात असल्याने स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागतेय याचा अंदाज बांधता येणार नाही. त्यामुळेच मत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट त्यांच्याशीच संवाद साधणार आहेत. यामुळे अधिकारी स्थानिक पातळीवर नेमके काय काम करतात याचा आढावाही घेतला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

https://youtube.com/watch?v=-6NmzpaoHoE

शेतकऱ्यांना पुरवल्या जाणार सुविधा

शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर व्हावी आणि शेतकऱ्यांना मुलभूत सोई-सुविधा मिळाव्यात हाच यामागचा उद्देश आहे. शेतकऱ्यांसह शेतामधील वातावरण, मातीपरिक्षण, पाणी परिक्षण यामधून सेवा दिली जाणार आहे. शेतकरी सुविधांपासून वंचिर राहु नेये हा सरकारचा आग्रह आहे. या मंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक असणार आहे. यामध्ये जिल्हााधिकारी व ग्रामपंचायत विभागतील अधिकारी कर्मचारी हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या काय आहेत हे देखील यानिमित्ताने समोर येणार आहे. राज्य सरकराचा अनोखा उपक्रम यशस्वी झाला तर एक वेगळा आदर्श तयार होईल यात शंका नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.