Mango cultivation : आंबा लागवडीच्या योग्य नियोजनाने होईल उत्पादनात दुप्पट वाढ, जाणून घ्या सर्वकाही
यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा फळपिकांना बसलेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंबा पिकाचे उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांनी विविध पध्दतीने झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न केला मात्र, अवकाळीची अवकृपा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम संपूर्ण वर्षभर राहिलेला आहे. त्यामुळेच यंदा सर्वकाही नुकासनीचे ठरत आहे. आंबा फळ बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावयाची असल्यास पुन्हा लागवड आणि ते ही योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे.
मुंबई : यंदा (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा फळपिकांना बसलेला आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंबा पिकाचे उत्पादन घटले आहे. शेतकऱ्यांनी विविध पध्दतीने झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न केला मात्र, अवकाळीची अवकृपा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम संपूर्ण वर्षभर राहिलेला आहे. त्यामुळेच यंदा सर्वकाही नुकासनीचे ठरत आहे. (Mango Fruit) आंबा फळ बागायतदार शेतकऱ्यांना पुन्हा फिनिक्स भरारी घ्यावयाची असल्यास पुन्हा लागवड आणि ते ही योग्य पध्दतीने होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी लागवडीपासूनच योग्य नियोजन केले तर भविष्यात होणारे नुकसान टळणार आहे. केवळ (Mango Cultivation) लागवड करायची म्हणून करायची असे न करता तंत्रशुध्द पध्दतीने लागवड केली तर उत्पादनात भर तर पडणारच आहे पण अधिकचा फायदाही शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात आंब्याचे क्षेत्र हे 4 लाख 85 हजार हेक्टर एवढे आहे. यामाध्यमातून 12 लाख टन उत्पादन मिळते. पारंपारिक पद्धतीमध्ये आंब्याची अभिवृद्धी कोयापासून केली जाते. कोय कलम, मृदूकाष्ठ कलम, व्हिनियर कलम या पद्धतीद्वारे कलमे तयार करुन अभिवृद्धी करण्यात येते.
या आहेत सुधारित संकरित जाती
आंब्याची लागवड करण्यासाठी सर्वात महत्वाची असते ती शेतजमिन. केवळ उगवण त्याच ठिकाणी लागवड न करता पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि चांगल्या प्रतीची शेतजमिन असणे गरजेचे आहे. मध्यम ते भारी प्रतीची म्हणजेच किमान 1.5 ते 2 मीटर अशाच दर्जाची खोली असणे गरजेचे आहे. यामध्ये हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज या आंब्याचा जाती आहेत.
ही आहे योग्य लागवड पध्दत
1 X 1 X 1 मी. आकाराचे खडे घेऊन त्यामध्ये 40 ते 50 किलो शेणखत + पोयटा माती + सिंगल सुपर फॉस्पेट 2 किलो मिश्रणाने भरा. एक वर्ष वयाच्या झाडास 15 किलो कंपोस्ट खत, 150 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद 100 ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून घ्यावी लागणार आहे. दरवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवून 10 व्या वर्षापासुन प्रत्येक झाड 50 किलो कंपोस्ट खत, 1.5 किलो नत्र, 500 ग्रॅम स्फुरद व 1 किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात द्यावे लागणार आहे.
पाण्याचे व्यवस्थापन आणि काढणी पध्दत
ज्याप्रमाणे पिकांना पाणी महत्वाचे आहे त्याचप्रमाणे फळबागांचेही आहे. पाण्याच्या उपलब्धेवरच उत्पादन ठरणार आहे. पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर 3 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागणार आहेत. आंबा बागेत 10 वर्षापर्यंत भाजीपाला, शेंगवर्गीय, ताग ही पिके आंतरपिके म्हणून घेता येतात. शिवाय फळांना लालसर रंगाची छटा येते. फळांचा रंग गर्द हिरव्यापासून फिकट होतो तसेच फळांच्या देठानजीक खोलगट भाग तयार होतो अशावेळी ते काढणी योग्य झाले असे समजावे. काढणीनंतर वजनाची प्रतवारी करावी लागणार आहे.
संबंधित बातम्या :
Agricultural Pump : निर्णय झाला मात्र, आदेश नसल्यामुळे जोडणी नव्हे तोडणीच सुरु, रब्बी धोक्यातच