Ratnagiri : आजीबाई जोमात..! 78 वर्षांच्या आजींकडून भात उत्पादनासाठी शेतीची मशागत, हातामध्ये थेट पॉवर ट्रेलरचे स्टेरिंग

आतापर्यंत बैलगाडीची स्वारी करताना महिला शेतकऱ्यांना पाहिले असेल. आता काळ बदलला. शेतीच्या कामांमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. बदलत्या काळातही कुंभार्ली गावच्या 78 वर्षाच्या सुनंदा वसंत सकपाळ या आजीबाईंनी स्वत: मध्ये बदल करुन थेट पॉवर ट्रेलरचे स्टेरिंग हातामध्ये घेतले. या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून त्यांनी भात शेतीसाठी मशागतीचे काम केले आहे.

Ratnagiri : आजीबाई जोमात..! 78 वर्षांच्या आजींकडून भात उत्पादनासाठी शेतीची मशागत, हातामध्ये थेट पॉवर ट्रेलरचे स्टेरिंग
पावसाच्या आगमनाने उत्साह वाढला अन् 78 वर्षाच्या आजीबाईंनी पॉवर ट्रेलरचे स्टेरिंग हातामध्ये मशागतीचे काम केले.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 11:31 AM

रत्नागिरी : यंदा पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली असली तरी (Farmer) शेतकऱ्यांचा उत्साह काय असतो याचा प्रत्यय सध्या रत्नागिरीत आला आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली असल्याने (Agricultural cultivation) शेती मशागतीची कामांना वेग आला आहे. या दरम्यानच एका 78 वर्षाच्या आजीबाईं पावरट्रेलरने शेतात नांगरणी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आजीबाईंचा उत्साह आणि (Kharif Season) खरिपातील पेरणी शेतकऱ्यांसाठी किती महत्वाची आहे याचाच प्रत्यय आजीबाईंच्या व्हिडिओमधून पाहवयास मिळत आहे. शेती कामासाठी शेतकरी कायम तत्पर असतो पण वरुणराजाने साथ दिली तर कायपण करण्याची शेतकऱ्यांची तयारी असते हेच यामधून समोर येत आहे.

पॉवर ट्रेलरचे स्टेरिंग आजीबाईंच्या हातामध्ये

आतापर्यंत बैलगाडीची स्वारी करताना महिला शेतकऱ्यांना पाहिले असेल. आता काळ बदलला. शेतीच्या कामांमध्ये यंत्राचा वापर वाढला आहे. बदलत्या काळातही कुंभार्ली गावच्या 78 वर्षाच्या सुनंदा वसंत सकपाळ या आजीबाईंनी स्वत: मध्ये बदल करुन थेट पॉवर ट्रेलरचे स्टेरिंग हातामध्ये घेतले. या अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून त्यांनी भात शेतीसाठी मशागतीचे काम केले आहे. त्यांचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.

धान पिकासाठी मशागतीची कामे

पावसाअभावी यंदा खरिपातील पेरणीला उशीर हा झालाच आहे. पण उशीरा का होईना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उत्पादन वाढीसाठी ही मशागत महत्वाची मानली जाते. शिवाय आता पावसामध्ये सातत्य राहिले तर लवकर धान पिकाची लागवडही होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला ऐकत पेरणीला गडबड केली नाही त्यामुळे संभाव्य धोका टळला आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील चित्र बदलले असून शेती मशागतीची कामे अधिक गतीने होत आहेत.

हे सुद्धा वाचा

पावसामध्ये सातत्य राहिल्यास धानाची लागवड

रत्नागिरी जिल्ह्यात धान पिकावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. यंदा पेरणीला उशीर होत असला तरी शेतकऱ्यांनी गडबड न केल्यामुळे नुकसान टळले आहे. आता कुठे पावसाने हजेरी लावल्याने पेरणी महत्वाची समजली जाणारी मशागतीची कामे सुरु झाली आहेत. पेरण्या लांबल्या तरी उत्पादनात घट होणार नाही याचा विश्वास कृषी विभागाने दिल्याने शेतकऱ्यांनी गडबड केली नाही आणि ती आज धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरलेली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.