उशिराचे शहाणपण : हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाणी पुरवठा करण्याचा पाटबंधारे विभागाचा ‘घाट’
यंदा सरासरीपेक्षा अधिकाचा पाऊस झाल्याने जलसाठे तुडूंब भरलेले आहेत. त्यामुळे किमान यंदा तरी शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळेल असे चित्र होते. धरण उभारणीचा मुळ उद्देश हा शेतीला पाणी हाच आहे. पण वाढत्या टंचाईमुळे अगोदर पिण्यासाठी आणि पुन्हा शेतीसाठी पाणी हा निर्णय घेण्यात आला होता. पण यंदा धरण भरल्याने शेतीसाठी असलेले राखीव पाणी पिकांना मिळणार होते.
लातूर : यंदा सरासरीपेक्षा अधिकाचा (Rain) पाऊस झाल्याने जलसाठे तुडूंब भरलेले आहेत. त्यामुळे किमान यंदा तरी शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळेल असे चित्र होते. धरण उभारणीचा मुळ उद्देश हा शेतीला पाणी हाच आहे. पण वाढत्या टंचाईमुळे अगोदर पिण्यासाठी आणि पुन्हा (Water for agriculture) शेतीसाठी पाणी हा निर्णय घेण्यात आला होता. पण यंदा (Manjra Dam) धरण भरल्याने शेतीसाठी असलेले राखीव पाणी पिकांना मिळणार होते. यासंदर्भात सर्वात अगोदर नाशिक पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणीही झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला मात्र, आता रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असताना लातूर पाटबंधारे विभागाने मांजरा आणि तेरणा प्रकल्पातील पाणी पिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. हंगाम अंतिम टप्प्यातच नाही तर काही क्षेत्रात रब्बी हंगामातील पिकांची काढणी कामेही पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या निर्णयाचा किती शेतकऱ्यांना फायदा होईल हे न सांगता येण्यासारखे आहे.
आरक्षित क्षेत्रावरील पाणीच शेतीसाठी
मांजरा आणि तेरणा हे जिल्ह्यासाठी महत्वदायी प्रकल्प आहेत. मांजरा धरणावरच लातूरकरांची तहान भागते तर या नदी काठचा परिसर हा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. भले धरण लातूर जिल्हा हद्दीत नसले तरी याचा फायदा जिल्हावासियांना होतो. या धरणात शेतीसाठी आरक्षित पाणी असते पण दरवर्षीच याचा लाभ मिळतो असे नाही. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेतीसाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने प्रक्रिया सुरु केली आहे. केवळ आरक्षित भागातीलच पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे.
शेतकऱ्यांना करावे लागणार अर्ज
लाभार्थ्यांना नमुना नंबर 7 वर ज्यांना पाण्याचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी अर्जासोबत सध्याचा वैध 7/12 उतारा जोडणे बंधनकारक आहे. तसेच सहकारी पाणी वापर संस्थेस तिच्या लागवडीखालील क्षेत्राच्या प्रमाणात स्वतंत्ररित्या पाणी कोटा मंजूर करण्यात आला असून, या संस्थांच्या वापर लाभक्षेत्रातील कोणत्याही वैयक्तिक लाभ धारकाला नमुना नंबर 7 वर पाणी पुरवठा केला जाणार नाही. त्याकरीता सहकारी पाणी वापर संस्थेतील लाभधारकांनी संस्थेकडेच पाणी मागणी नोंदविणे आवश्यक आहे.
अन्यथा दंडात्मक कारवाई
सध्या रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात आहेत. याच पिकांच्या रचनेनुसार पाण्याचे वाटप केले जाणार आहे. शिवाय याकरिता पाटबंधारे विभागाकडून नियम-अटी घालून दिल्या आहेत. अर्ज न करता शेतकऱ्यांनी धरणातील पाणी घेतले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शिवाय हा पुरवठा पिण्याचे पाणी आरक्षित ठेऊन केला जाणार आहे.
संबंधित बातम्या :
ऊसतोड रखडल्याने शेतकऱ्यांनी शोधला ‘हा’ मधला मार्ग, मागणीही अन् वाढता दरही
Weather Report | राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज
उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान, काय आहे तज्ञांचा सल्ला?