Banana : घसरत्या केळी दराला मिळणार का सणासुदीचा आधार! महिन्याभरातच दर निम्म्यावर, खानदेशातील स्थिती काय?
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खानदेशातील जळगावसह इतर जिल्ह्यातील केळीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातील केळीचे दर थेट 2 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. शिवाय आवक घटल्याने हेच दर महिन्याभरात थेट 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचले होते. त्यामुळे केळी उत्पादकांना अच्छे दिन आले होते. कमी उत्पादन झाले तरी अधिकच्या दरामुळे उत्पादनावर केलेला खर्च भरुन निघत होता.
जळगाव : (The vagaries of nature) निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम यंदा (Khandesh) खानदेशातील केळी उत्पादनावर झालेला आहे. त्यामुळे केळीची आवकही कमी झाली आहे. असे असले तरी बिहार, गुजरात, मध्यप्रदेशातून आवक वाढली आहे. वाढत्या आवकमुळे आणि व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे (Banana Rate) केळीच्या दरात घसरणच सुरु आहे. महिन्याभराच केळीचे भाव हे 3 हजार रुपये क्विंटलवरुन थेट 1 हजार 500 रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहेत. यामध्ये आवक वाढल्याचे कारण असले तरी दुसरीकडे व्यापाऱ्यांनी केलेल्या खेळीचाही परिणाम होऊ लागला आहे. व्यापाऱ्यांनी ठरवूनच केळीचे सौदे कमी रकमेस करण्यास सुरवात केली आहे. त्याचा देखील परिणाम दरावर होऊ लागला आहे. मात्र, आता लक्ष्मी, गणेशोत्सव, पितृपक्ष आणि नवत्रोत्सव यामुळे केळीच्या दरात सुधारणा होणार का हे पहावे लागणार आहे.
परराज्यातील केळी खानदेशात
यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे खानदेशातील जळगावसह इतर जिल्ह्यातील केळीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरवातील केळीचे दर थेट 2 हजार रुपये क्विंटलवर गेले होते. शिवाय आवक घटल्याने हेच दर महिन्याभरात थेट 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचले होते. त्यामुळे केळी उत्पादकांना अच्छे दिन आले होते. कमी उत्पादन झाले तरी अधिकच्या दरामुळे उत्पादनावर केलेला खर्च भरुन निघत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बिहार, मध्यप्रदेश आणि गुजरातहून केळीची आवक ही वाढली आहे. त्यामुळे केळीचे दर हे 1 हजार 500 रुपयांवर येऊन ठेपले आहेत.
तरच मिळणार नवसंजीवनी
निसर्गाच्या लहरीपणाचा केवळ खरीप हंगामातील पिकांवरच झाला असे नाही तर गतरर्षीच्या अवकाळी पावसामुळे फळबागाही धोक्यात होत्या. खानदेशात अनेक शेतकऱ्यांनी तर केळीच्या बागा मोडीत काढल्या. असे असले हंगाम सुरु होताच समाधानकारक दर मिळाला होता. शिवाय दरात कायम वाढ होत गेली आणि अल्पावधीतच केळीचे दर हे थेट 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचले होते. मात्र, व्यापाऱ्यांची भूमिका आणि वाढलेली आवक यामुळे पुन्हा दरात घसरण सुरु झाली आहे. खानदेशातील केळीचा उठाव हा कमी आहे. कारण खानदेशातून केळी ही उत्तरप्रदेशाच पोहचवण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेत खर्च आणि वेळही अधिक लागतो. आता सणोत्सावातच केळीच्या दराला आधार मिळेल या आशेवर उत्पादक आहेत.
जाहीर दरापेक्षा कमीने खरेदी
केळीची खरेदी ही बाजार समितीने जाहीर केलेल्या दराप्रमाणे करावी असा नियम आहे. शिवाय केळीचे दर रावेर बाजार समितीच्या माध्यमातून जाहीर केले जातात. दर्जेदार केळीसाठी 2 हजार 200 असा दर जाहीर केला जात आहे. खरेदीदार या दराकडे दुर्लक्ष करीत वेगवेगळी कारणे देत कमी दराने खरेदी करीत आहेत. सर्वच खरेदीदाराची याबाबत ऐकी झाल्याने शेतकरीही हताश आहेत. त्यामुळे 3 हजार रुपये क्विटंलवर गेलेले केळीचे दर आता थेट 1 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहेत.