सांगली : सांगलीच्या तासगाव मार्केटमध्ये बेदाण्याला हंगामातील सर्वात मोठा दर मिळाला आहे. मार्केटमध्ये आज भोसेचे शेतकरी शीतल खोत यांच्या बेदाण्याला तब्बल 321 रुपये दर मिळाला आहे. वर्षातील सर्वात उच्चांकी दर मिळाल्यामुळे महिला शेतकरी शीतल खोत यांनी समाधान व्यक्त केलंय. (woman farmer of sangli district gets highest price to raisins on her birthday)
मिरज तालुक्यातील भोसे येथील शेतकरी शीतल खोत यांच्या बेदाण्याला 321 रुपये किलो भाव मिळाला आहे. त्यातच शीतल यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच सर्वात जास्त भाव मिळाल्यामुळे हा चांगलाच योगायोग असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सांगली जिल्ह्यात द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याच द्राक्षांपासून बेदाणा तयार केला जातो. येथील बेदाण्याची परराज्यातही निर्यात केली जाते. सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये बेदाणा खरेदी विक्रीची मोठी बाजारपेठ आहे. सांगलीतील शेतकरी तासगावमध्ये बेदाणे विक्रीस आणतात. आज बेदाण्याला हंगामातील सर्वात मोठा दर मिळाला आहे.
बेदाण्याला मिळालेला उच्चांकी भाव तसेच वाढदिवस असल्यामुळे व्यापाऱ्यांनी या महिला शेतकरी शीतल यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला. तासगावच्या गौरी शंकर ट्रेडिंगमध्ये पाटील ऍग्रो टेक यांनी हा बेदाणा घेतला आहे.
तर दुसरीकडे महागाई टाळण्यासाठी डाळींच्या किमती मर्यादित ठेवण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करीत आहे. याबाबत सर्व राज्यांना पत्रे लिहून डाळींचा साठा मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 17 राज्यांमध्ये 217 व्यापाऱ्यांकडे स्टॉक मर्यादेपेक्षा जास्त डाळ आहे. आतापर्यंत व्यापाऱ्यांनी 31 लाख मेट्रिक टन डाळींचा साठा जाहीर केला आहे. सरकारने 500 मेट्रिक टन डाळीची साठा मर्यादा लागू केली आहे.आतापर्यंत 7.59 मेट्रिक टन डाळी आयात करण्यात आल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात डाळीचा स्टॉक तयार करण्यासाठी सरकार आयात करीत आहे. सरकारने 1 लाख टन मसूर डाळ आयात करण्याचे आदेश दिले. गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये देशात 38.80 मेट्रीक टन, उडीद डाळ 24.50 मेट्रीक टन, मसूर 13.50 मेट्रीक टन, मूग डाळ 26.20 एमटी आणि चना डाळ 116.20 या वर्षी देशात उत्पादित करण्यात आली. तर तूर, उडीद, मसूर, मूग आणि चना डाळ अनुक्रमे 4.40 मेट्रीक टन, 3.21 मेट्रीक टन, 11.01 मेट्रीक टन, 0.52 मेट्रीक टन आणि 2.91 मेट्रीक टन या प्रमाणात आयात करावी लागली.
इतर बातम्या :
मध केंद्रासाठी 50 टक्के अनुदान, खादी व ग्राम उद्योग केंद्राकडून अनुदनासह मिळणार प्रशिक्षण
केंद्र सरकारचा दिलासा : दाळीचे दर राहणार मर्यादीत, सणाच्या तोंडावर मोठा निर्णय
बारामतीत मोठी दुर्घटना, शेतात काम सुरु असताना अचानक वीज कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू, एक अत्यवस्थhttps://t.co/57zkKjHiEC#Baramati #lightningstrike #Pune #Rain
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 20, 2021
(woman farmer of sangli district gets highest price to raisins on her birthday)