Watermelon : मुख्य पिकांपेक्षा हंगामी कलिंगडातून उत्पन्न, विक्रमी दराने सुरुवात, मिटला शेतकऱ्यांचा वनवास

पीक हंगामी असो की मुख्य अधिकचे उत्पन्न हाच शेतकऱ्यांचा उद्देश राहिलेला आहे. शिवाय बदलत्या पीक पध्दतीमधून शेतकरी आपला उद्देश साध्य करीत आहे. कलिंगड असे पीक आहे जे तीन मुख्य टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी पडले तरी अधिकचे उत्पन्न मिळते. सध्या बाजारपेठेत दाखल होत असलेले कलिंगड हे उन्हाळ्याच्या तोंडावर विक्री करता या अनुशंगाने लागवड केलेले आहेत.

Watermelon : मुख्य पिकांपेक्षा हंगामी कलिंगडातून उत्पन्न, विक्रमी दराने सुरुवात, मिटला शेतकऱ्यांचा वनवास
यंदा उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याने हंगामाच्या सुरवातीलाच विक्रमी दर मिळत आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 5:35 AM

जालना : पीक हंगामी असो की मुख्य अधिकचे उत्पन्न हाच (Farmer) शेतकऱ्यांचा उद्देश राहिलेला आहे. शिवाय बदलत्या पीक पध्दतीमधून शेतकरी आपला उद्देश साध्य करीत आहे. (Watermelon) कलिंगड असे पीक आहे जे तीन मुख्य टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या पदरी पडले तरी अधिकचे उत्पन्न मिळते. सध्या बाजारपेठेत दाखल होत असलेले कलिंगड हे (Summer Season) उन्हाळ्याच्या तोंडावर विक्री करता या अनुशंगाने लागवड केलेले आहेत. आता दुसरा टप्पा हा रमजान महिन्यात तोडणीला येणारा आहे. काही दिवसांच्या फरकाने केलेली लागवड शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देऊन जाते. यंदा तर हंगामाच्या सुरवातीला कलिंगडला 10 रुपये किलो असा दर मिळाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जे नुकसान झाले ते भरुन काढण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहे. एकीकडे कलिंगड विक्री सुरु आहे तर दुसरीकडे काही भागात लागवड. हेच कलिंगडचे वेगळेपण असून एकरी लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे.

मुबलक पाणी आणि पोषक वातावरण

यंदा कलिंगडसाठी पोषक वातावरण आहे पण गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ओढावलेल्या परस्थितीमुळे काही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली तर काहींनी उत्पादन हे घेतलेच आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने पाण्याची चिंता मिटलेली आहे. खरिपानंतर शेतजमिनीची मशागत करुन कलिंगड लागवडीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी भर दिला होता. शिवाय पोषक वातावरण असल्याने यंदा प्रयोग अयशस्वी होईल असे काहीच नाही. तर दुसरीकडे उन्हाळ्याच्या तोंडावरच विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे उत्पन्नाबाबत गेल्या दोन वर्षाचा वनवास यंदा मिटणार अशी स्थिती आहे.

व्यापारी थेट बांधावर

ज्याची मागणी अधिक त्या पिकामधून उत्पादन तर मिळतेच पण बाजारपेठेपर्यंतही जाण्याची तसदी शेतकऱ्यांना घ्यावी लागत नाही. पहिल्या लागवडीतील कलिंगडची सध्या तोडणी सुरु असून खरेदीसाठी व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचत आहेत. शुगर किंग आणि मक्स या वाणांच्या कलिंगडला अधिकची मागणी आहे. एकरी 6 टन कलिंगडचे उत्पादन जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतले आहे. शिवाय 10 रुपये किलो असा दर मिळाला असून या कलिंगडची विक्री ही कर्नाटकात होत आहे. त्यामुळे मुख्य पिकांमधून जे घडले नाही ते यंदा हंगामी पिकांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra : धान उत्पादक शेतकऱ्यांना ना बोनस ना एकरी मदत, राज्य सरकारकडून निराशा

Bhandara : पीक पध्दतीमध्ये बदल, धान शेतीला मकाचा उत्तम पर्याय, कमी खर्चात अधिकचे उत्पादन

Success Story : अतिरिक्त ऊसाचा प्रश्नच बनला शेतकऱ्यांच्या उद्योगाचे कारण..! वर्षाकाठी लाखोंचे उत्पन्न, वाचा सविस्तर

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.