बीड जिल्हा आढावा : यावेळी राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे.

बीड जिल्हा आढावा : यावेळी राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 7:06 PM

बीड : राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा म्हणजे बीड (Beed assembly seats) अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत आहे. कारण, 2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय.

बीड

बीड विधानसभा मतादरसंघात यावेळी काका-पुतण्याची लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण, पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे उमेदवार मानले जात आहेत. 2014 ला जयदत्त क्षीरसागर विरुद्ध भाजपकडून विनायक मेटे यांच्यात थेट लढत झाली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड शहरात विनायक मेटे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली. मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी मोदी लाटेचा सामना करत विनायक मेटे यांना पाच हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभूत केलं.

परळी

राज्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत परळीत होण्याची शक्यता आहे. कारण, पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यात ही लढत असेल. धनंजय मुंडेंनी ही अस्तित्वाची लढाई असल्याचं म्हटलंय. पंकजा मुंडेंनी 2014 ला 25895 मतांनी धनंजय मुंडेंवर मात केली होती.

गेवराई

2014 ला भाजपचे उमेदवार लक्ष्मण पवार यांनी 60 हजारपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या लक्ष्मण पवार यांनाच यावेळीही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

माजलगाव

माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना आर. टी. देशमुख यांनी 37245 मतांनी पराभूत केलं होतं. माजलगावमध्ये यावेळीही वेगळ्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांनाच मिळते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आष्टी

आष्टी-पाटोदा-शिरुर हा मतदारसंघ बीडमध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ मानला जातो. गेल्या निवडणुकीत 2 लाख 50 हजार 502 मतदारांनी (73.70 टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे भिमराव धोंडे 48.30 टक्के मतं घेऊन विजय झाले, तर तेव्हाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनीही कडवी झुंज देत 45.90 टक्के मतं घेतली होती. धोंडे फक्त 5982 मतांच्या फरकाने जिंकले. पण यावेळी सुरेश धसही भाजपात असल्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल त्याकडे लक्ष लागलंय.

केज

2014 ला भाजपच्या उमेदवार संगिता ठोंबरे यांनी 42 हजार 721 मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात नमिता मुंदडा या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. पण यावेळी मतदारसंघातील स्थानिक समीकरणं बदलल्याने उत्सुकता वाढली आहे.

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.