लातूर : काँग्रेसला बालेकिल्ला (Latur Assembly seats) मानल्या जाणाऱ्या लातूरमध्ये यावेळी भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी चक्रव्यूह आखला आहे. 2014 च्या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या. एक अपक्ष, तर दोन जागांवर भाजपने झेंडा फडकवला. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने शतप्रतिशत (Latur Assembly seats) विजयाची तयारी केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं ते महत्त्वाचं ठरणार आहे.
लातूर ग्रामीण
या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार त्रिंबकराव भिसे यांनी भाजपचे रमेश कराड यांच्यावर 10 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला. भिसे यांना एक लाख, तर कराड यांना 90 हजार मतं मिळाली होती.
लातूर शहर
दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांनी तब्बल 49 हजार 465 मतांनी विजय मिळवला होता. पण यावेळी अमित देशमुख यांच्यासाठी मार्ग खडतर असणार आहे. याची प्रचिती लातूर महापालिका निवडणुकीत आली होती.
अहमदपूर
या मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनायक जाधव पाटील यांनी भाजपचे बाबासाहेब पाटील यांच्यावर चार हजारपेक्षा जास्त मतांनी मात केली. यावेळी विनायक पाटील भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे इथे भाजपची ताकद वाढली आहे.
उदगीर
भाजपचे उमेदवार सुधाकर भालेराव यांनी 2014 ला उदगीरमधून 24894 मतांनी विजय मिळवला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार संजय बनसोडे यांनी 41792 मतं मिळवली होती.
निलंगा
विद्यमान मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 2014 ला 27511 मतांनी काँग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर यांच्यावर मात केली होती. यावेळी संभाजी निलंगेकरांनी जिल्ह्यातील संपूर्ण जागा जिंकण्याचा निर्धार केलाय.
औसा
या मतदारसंघात काँग्रेसचे बसवराज पाटील यांनी 8 हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने शिवसेनेचे दिनकर माने यांच्यावर मात केली होती. शिवाय भाजपचे उमेदवार पाशा पटेल यांनीही या मतदारसंघात 37 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली होती.