धुळे आढावा : तीन आमदार देणाऱ्या जिल्ह्यात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

| Updated on: Sep 10, 2019 | 5:52 PM

या लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेली मतं पाहता काँग्रेसची चिंता वाढली आहे. शिवाय ही निवडणूक युतीमध्ये लढवली जाणार असल्यामुळे शिवसेनेकडूनही धुळ्यात जागांची (Dhule assembly seats) मागणी होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे.

धुळे आढावा : तीन आमदार देणाऱ्या जिल्ह्यात काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
Follow us on

धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केलाय. धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी (Dhule assembly seats) काँग्रेसकडे तीन आणि भाजपकडे दोन मतदारसंघ आहेत. पण या लोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेली मतं पाहता काँग्रेसची चिंता वाढली आहे. शिवाय ही निवडणूक युतीमध्ये लढवली जाणार असल्यामुळे शिवसेनेकडूनही धुळ्यात जागांची (Dhule assembly seats) मागणी होते का ते पाहणं महत्त्वाचं आहे.

साकरी

काँग्रेसचे धनाजी अहिरे यांनी या मतदारसंघात 3323 मतांनी विजय मिळवत भाजपच्या मंजुळा गावित यांचा पराभव केला होता. धनाजी अहिरे यांना 74760 आणि मंजुळा गावित यांना 71437 मतं मिळाली होती. इथे शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता.

धुळे ग्रामीण

या मतदारसंघात काँग्रेसचे नेते कुणाल पाटील यांनी 46 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. भाजपचे मनोहर भदाने इथे दुसऱ्या क्रमांकावर होते.

धुळे शहर

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी धुळे शहर मतदारसंघातून 12 हजार 928 मतांनी विजय मिळवला होता. पण यावेळी या मतदारसंघातील समीकरणे बदलली आहेत. अनिल गोटेंनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे भाजपकडून स्थानिक समीकरणे कशी जुळवली जातात त्याकडे लक्ष लागलंय.

सिंदखेडा

भाजपचे उमेदवार जयकुमार रावल यांनी सिंदखेडा मतदारसंघातून 42 हजार 158 मतांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या संदीप बेडसेंवर मात केली होती. यावेळी पुन्हा एकदा रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

शिरपूर

काँग्रेसचे काशिराम वेचन यांनी शिरपूरमधून 25 हजार 201 मतांनी विजय मिळवला होता. भाजपचे डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्यावर त्यांनी मात केली होती. यावेळी शिरपूरमध्ये पुन्हा एकदा काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

धुळे : 05 (Dhule MLA list)

5 – साक्री- धनाजी अहिरे (काँग्रेस)

6 – धुळे ग्रामीण- कुणाल पाटील (काँग्रेस)

7 – धुळे शहर- अनिल गोटे (भाजप)

8 – सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजप)

9 – शिरपूर- काशीराम पावरा (काँग्रेस)