सोलापूरचा आढावा | काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर युतीचं तगडं आव्हान

सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर शिवसेना- भाजपने पकड मिळवली आहे.

सोलापूरचा आढावा | काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर युतीचं तगडं आव्हान
Follow us
| Updated on: Sep 13, 2019 | 1:05 PM

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत. एकेकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यावर शिवसेना- भाजपने पकड मिळवली आहे. 2014 च्या निवडणुकीत सेना-भाजपला 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज सेना-भाजपच्या वाटेवर असल्याने युतीची ताकद इथे वाढली आहे.

सोलापूर  जिल्हा – 11  (Solapur MLA List)

244 – करमाळा – नारायण पाटील (शिवसेना)

245 – माढा – बबन शिंदे (राष्ट्रवादी)

246 – बार्शी – दिलीप सोपल (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना )

247 – मोहोळ – रमेश कदम (राष्ट्रवादी)

248 – सोलापूर शहर उत्तर – विजय कुमार देशमुख (भाजप)

249 – सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे (काँग्रेस)

250 – अक्कलकोट – सिद्धराम म्हेत्रे (काँग्रेस)

251 – सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख (भाजप)

252 – पंढरपूर – भारत भालके (काँग्रेस)

253 – सांगोला – गणपतराव देशमुख (शेकाप)

254 – माळशिरस – हनुमंत डोळस (राष्ट्रवादी)

1) सोलापूर शहर मध्य मतदार संघ – (Solapur City central Vidhan sabha)

आमदार प्रणिती शिंदे यांना बुडत्या जहाजाला वाचविण्याचे मोठे आव्हान

सोलापूरची राजकारणात खरी ओळख आहे ती कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळे. सलग दुसऱ्यांदा  काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला. त्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या शहर मध्य मध्य मधून 31 हजाराची पिछाडी मिळाली आणि याच मतदारसंघाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे करतात. त्यामुळे मागील दोन निवडणुका पाहता शिंदे कुटुंबीयाच्या वोटबँकेला ओहोटी लागेलेली दिसतेय.

2009 पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जाई जुई च्या माध्यमातून केली . माकपाचे  तत्कालीन आमदार आणि कामगार नेते  नरसय्या आडम यांचा पराभव करत आपल्या राजकीय जीवनाची ओपेनिंग केली ,, त्यानंतर  2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत  मोदी लाटेतही प्रणिती शिंदे यांनी  एमआयएम आणि शिवसेनच्या उमेदवारांना धूळ चारून विजय मिळवला. विशेष म्हणजे याच निवडणुकीत  वेगवेगळ्या लढलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांची एकत्रित बेरीज ही प्रणिती शिंदे यांच्या मताधिक्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे यंदाच्या वेळेस तरी भाजपा आणि शिवसेना युती व्हावी यासाठी युतीच्या जागावाटपात सुटलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटत आहे.

शहर मध्य मतदार संघ हा मुस्लीम बहुल मतदार संघ म्हणून ओळखला जातो . जवळ-जवळ १ लाख मतदार मुस्लिम समाजातील आहे. त्याखालोखाल दलित, तेलगु भाषिक समाजाचाही मोठ्या प्रमाणावर या विधानसभा मतदान संघात संख्या आहे.,विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात विडी कामगार आणि यंत्रमाग कामगार याच मतदार संघात वास्तव्यास आहेत. कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता आणि त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून हक्काची घरे मिळवून देण्याच्या भूमिकेमुळे   कामगारांनी  माकपच्या  नरसय्या आडम यांच्या सीपीआयएमला देखील या मतदार संघातून संधी दिली होती ,मात्र २००९ नरसय्या आडम यांचा  पराभव करत प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसला नवं नेतृत्व मध्य मतदारसंघातून दिलं.

२०१४ मध्ये झालेल्या  लोकसभा निवडणुकीत   खरी लढत झाली ती एमआयएम आणि कॉंग्रेस मध्येच.एकेकाळी कॉंग्रेसचे नगरसेवक असलेले मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळेस एमआयएम मध्ये प्रवेश केला. मोठ्या प्रमाणात असलेल्या मुस्लीम मतांच्या जोरावर  एमआयएमचे तौफीक शेख यांनी प्रणिती शिंदे यांना कडवी झुंज दिली. म्हणूनच की काय निकालानंतर   प्रणिती शिंदे यांच्या विजयापेक्षा तौफीक शेख यांच्या पराभवाचे चर्चा अधिक झाली. मात्र आता साडे चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे मतदार संघातील स्थिती आता हळूहळू बदलताना दिसत आहे ,

गेल्या निवडणुकीत एमआयएमचे एमआयएमचे तौफिक शेख ३७ हजार मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. यंदाच्या विधानसभेत एमआयएमसोबत प्रकाश आंबेडकरांची साथ मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएमच्या तौफिक शेख यांच्याकडे मतदार संघातील लोकांचा झुकता माप दिसत होता ,मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर  तौफीक शेख यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने  ते सध्या तुरुंगात हवा खात आहेत . २०१४ च्या विभानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या नाकी नऊ आणणाऱ्या तौफिक शेख सध्या तुरुंगात असल्याने  आमदार प्रणिती शिंदे यांचे थोडेसे विघ्न कमी झालेले असताना स्वकीयांनीच बंडाचा झेंडा उगरालाय ,,कॉंग्रसचे माजी महापौर यु ,एन ,बेरिया यांनी कॉंग्रेसने अनेक वेळा मागणी करून सुधा मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली नाही ,यंदाच्या वेळेस कॉंग्रेसने मुस्लीम उमेदवाराला संधी देण्याची मागणी केलीय ,त्यामुळे स्वपक्ष्यातल्या लोकांनी बंडाची भाषा केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत ,, तर  मुस्लीम बहुल मतदार संघावर डोळा ठेवून  गत विधानसभा निवडणुकित  अक्कलकोट मतदारसंघातून मनसेतर्फे निवडणूक लढविलेले फारुख शाब्दी आणि सोलापूर शहरात मुस्लिम समाजात सामाजिक कार्य़ करणारे इम्तियाज पिरजादे हे वंचिततर्फे इच्छूक असल्याचं बोललं जातंय.त्यामुळे प्रणिती शिंदेच्या अडचणी वाढवणाऱ्या आहेत.

एकीकडे एमआयएमचे तगडे आवाहन असताना  दुसरीकडे  सध्या राज्यात भाजपा बरोबर सत्तेत असलेल्या   शिवसेनेच्या  महेश कोठे यांची या मतदार संघात जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे ,,, यंदाच्या लोकसभा निवडणकित भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे ,मात्र या मतदार संघात भाजपकडे म्हणावा तसा उमेदवार नाही,, मात्र भाजप सेनेकडे या मतदारसंघात म्हणावा तसा उमेदवार नाहीये. प्रणिती शिंदे आणि महेश कोठे यांच्यात अडवा विस्तव जात नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत  शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांनाही 33 हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती.ते तिसऱ्या क्रमांकावर होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि  यंदाच्या विधानसभेत भाजप-सेना युती झाल्यास भाजप-सेनेच्या उमेदवार ही निव़डूण येण्याची शक्यता दाट आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीचा फटका  काँग्रेसला बसेल त्यामुळे यंदाची निवडणूक कॉंग्रेसच्या बुडत्या जहाजाला वाचविण्याची मोठी जबाबदारी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आहे.

2014 च्या विधानसभेत मिळालेली मतं

  • प्रणिती शिंदे, काँग्रेस – 46907
  • तौफिक शेख, एमआयएम – 37138
  • महेश कोठे, शिवसेना – 33334
  • मोहिनी पत्की, भाजप – 23319

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या

पुरुष – 147751

महिला – 144512

इतर – 10

एकूण – 292273

2019 च्या लोकसभेत मध्य विधानसभेतून उमेदवारांना मिळालेली मतं

  • डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप – 80823
  • सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस – 49994
  • प्रकाश आंबेडकर, वंचित – 27468

2) सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ  (solapur city north vidhan sabha)

सलग चौथ्यांदा पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची घोडदौड राहणार का?

सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील  शहर उत्तर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातोय ,१९९० चा अपवाद वगळता १९९० पासून  भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या   या मतदार संघात इथल्या मतदारांनी  तीनवेळा  वेळा आपला प्रतीनिधी म्हणून  पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना  विधानसभेत पाठविला. त्यामुळे विद्यमान  आमदार आणि पालकमंत्री विजयकुमार  देशमुख यांना यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्वीकारलं तर मतदार संघात  एक नवा इतिहास निर्माण होणार आहे.

सोलापूर शहरातील तीन मतदार संघापैकी मोठ्या प्रमाणात असलेल्या व्यापारी पेठा ,,बरोबरच लिंगायत ,,मराठा आणि तेलगु भाषिक लोकांची  संख्या समप्रमाणात असलेला शहर उत्तर मतदार संघ ,यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पालकमंत्री विजय देशमुख निवडणूक रिंगणात उतरणार आहेत , ,,सलग तीन  वेळा कॉंग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव करून गेल्या १५  वर्ष्यापासून शहर उत्तर मतदार संघाचे  प्रतिनिधत्व करताहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हि याच मतदार संघातून  तब्बल ६५  हजार  मतांची  आघाडी भाजपाने घेतली होती ,,,तर मागील विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री देशमुखांनी ८६ हजार ८०७ मते मिळवत राष्ट्रवादीचे महेश गादेकर यांचा ६८ हजार ८७८ मताधिक्यानी  पराभव केला होता ,, मागील  गेल्या १५  वर्ष्यात केलीली कामे आणि विकासाच्या जोरावर आपण  निवडणुकीत  उतरणार असल्याचा दावा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने या मतदार संघात  घेतलेली मोठी आघाडी ,आणि त्यांचे  कट्टर राजकीय  प्रतीस्पर्धी  कॉंग्रेसचे महेश कोठेनी गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवसेनेत प्रवेश करून शहर मध्य मध्ये विधानसभेची तयारी करत असल्यामुळे पालकमंत्री  विजय देशमुखांची प्यादी सरकायला मोकळीक झाली असतानाच ,,,,भाजपाच्याच कांही नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काटे अंतरले आहेत ,सलग तीन वेळा निवडून आल्यामुळे मंत्री देशमुखांनी यावेळी आराम करण्याचा सल्ला देत या मतदारसंघावर महापौर शोभा बनशेट्टींनी दावा केला.

पालकमंत्री विजयकुमार  देशमुखाना भाजपा अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागत असले तरी त्यांच्यासमोर सध्या तरी कुणाचे मोठे आव्हान दिसत नाही. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून लढणारे महेश कोठे आता शिवसेनेकडून शहर मध्य मतदारसंघात  निवडणूक लढणार असल्यामुळे, आमदार देशमुखांच्या विजयाची वाट मोकळी होतानाचं चित्र आहे. आघडीच्या वाटणीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे ,मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार कोण याचा पत्ताच नाही.

सध्या राष्ट्रवादीकडून संतोष पवार यांच्या नावाची चर्चा आहे ,यंदाच्या लोकसभा  निवडणुकीत प्रकाश आंबेडकर प्रणित वंचित बहुजन आघाडीनचा सोलापुरात शिरकाव झाला आहे ,लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घाम फोडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभेसाठी सुद्धा कंबर कसलीय ,वंचित बहुजन आघाडीकडून नगरसेवक आनंद चंदनशिवे हे उमेदवार असल्याची शक्यता आहे मात्र सत्तेच्या सारीपाटात ज्यांच्या जीवावर हे हे आमदार होतात किंवा आमदारकीचे स्वप्न पाहतात ,त्या मतदारांच्या  रोजच्या जीवनमरणाच्या  समश्या आणि  आमदारांच्या कामाबाबत मात्र संमिश्र प्रतिक्रिया आहेत ,, एकंदरीत देशमुखाच पारड जड असलं तरी  त्यांच्या समोर स्वकीयांनीच अंथरलेले काटे दूर सारून आपला गाडा पुढे ढकलत यावेळची लढाई जिंकून सलग चौथ्यांदा  विजयी होवून एक नवा इतिहास घडवतील का हे पाहावं लागेल.

विधानसभा मिळालेली मत –

१)विजयकुमार देशमुख ,भाजप ,८६ ८७७

2) महेश गादेकर राष्ट्रवादी ,१७९९९

३ )विश्वनाथ चाकोते (कॉंग्रेस )  १४४ ५६

3) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ – (Akkalkot Vidhansabha)

कॉंग्रेसचा बालेकिल्ला असेलेल्या मतदारसंघाला सुरुंग लागणार?

अक्कलकोट विधानसभा मतदार संघ महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेले आणि तितकचं दुर्लक्षित  संवेदनशील असा विधानसभा  मतदार संघ. निवडणुका आल्या की इथे विकास कामापेक्षा  हमरीतुमरी, वैयक्तिक आरोप प्रत्यारोप यामुळेच इथली निवडणूक चर्चेत राहते. ,सध्या ज्या भारतीय जनता पक्षाचा म्हणावा तितका राज्यात प्रभाव नव्हता त्यावेळी  1995 साली स्वर्गीय बाबासाहेब तानवडेनि भाजपचा कमळ फुलविल होत. मात्र त्यांच्या त्यांच्या निधनानंतर  2009 चा अपवाद वगळला तर काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व आहे , मात्र दुसऱ्यांदा  लोकसभा निवडणुकीत  काँगेसची बुरुजं हळुहळु ढासळू लागली आहे,अनेक दिग्गज भाजपवाशी होत आहेत,,तर कुणी शिवबंधनात अडकत आहे ,. म्हणूनच या मतदार संघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत असल्याची मोठी चर्चा मतदार संघात आहे.

2014च्या लोकसभेच्य़ा मोदी लाटेनंतर विधानसभेत सुद्धा भाजपचा कमळ फुलला. मात्र अक्कलकोट मतदारसंघ त्याला अपवाद ठरला. 2014 साली सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसचा गड परत मिळवला. मात्र गेल्या चार वर्षात इथली राजकीय समीकरणांची उलथापालथ झाली की म्हेत्रे स्वत:च भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं आहे. म्हेत्रे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांच्याशी कोणत्या पक्षात राहावं याविषयी चर्चा केली. कार्यकर्त्यांची येथे इच्छा असेल तेथे जाऊ असे म्हणत जणू भाजप प्रवेशाचा सुचक इशाराच दिला. आषाढी वारीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे सोलापूर विमानतळावर आवर्जून उपस्थित होते. त्यावरुन त्यांच्या पक्ष बदलांच्या चर्चांना उधाण आलं. सिद्धाराम म्हेत्रेंनी देखील या चर्चांना थेट नकार दिला नाही उलट भाजपकडून अद्याप विचारणा झाली नाही ज्यावेळी विचारणा होईल त्यावेळी पाहू असे विधान केल्याने जणू भाजपच्या आमंत्रणाची वाट पाहत असल्याचा सुचक इशाराच दिला.

1997 पासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचं राजकारण हे पुर्णत: सिद्धाराम म्हेत्रेंच्या अवती भवती घुमतं. 97 च्या पोटनिवडणुकीतून म्हेत्रे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2009 ची विधानसभा वगळता त्यांनी अक्कलकोटमधून काँग्रेसला नेतृत्व दिलं. म्हेत्रे यांचा 2009 ला पराभव करणारे भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांच्यात आडवे विस्तव जात नव्हते. 2014 पर्यंत या दोघांमध्ये मोठी राजकीय खुन्नस होती. 2014 नंतर काही कारणांसाठी सिद्रामप्पा पाटील हे भाजपपासून दूरावले. आणि एकमेकांचे राजकीय हाडवैर असलेले म्हेत्रे-पाटील एकत्रित आले. त्यामुळे यांच्या समोर आता कोणाचा निभाव लागणार नाही असे अक्कलकोट तालुक्यात मतदारांचा सूर होता. मात्र याच दरम्यान भाजपतर्फे सचिन कल्याणशेट्टी यांनी संघटनात्मक कार्यावर भर दिला. नगरपरिषदा, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकांत भाजपला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. या साऱ्याचं श्रेय स्थानिक भाजप नेते सचिन कल्याणशेट्टीला दिलं जातं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विद्यमान आ. सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाकडून सचिन कल्याणशेट्टी यांच्यात थेट लढाई होण्याचे जवळपास निश्चित मानले जात होते.

मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा दुसऱ्यांदा भाजपनं दारुण पराभव केला. पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या नवख्या डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी शिंदेचा पराभव केला. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून महास्वामींना तब्बल 47 हजार मतांचे मताधिक्य मिळाले. त्यावरुन अक्कलकोटमध्ये देखील भाजपची लोकप्रियता वाढली हे स्पष्ट होते. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे अक्कलकोटमधलेच असल्याने त्याचप्रमाणे लिंगायत धर्मगुरु असल्याने म्हेत्रेंना आपल्या विजयाबद्दल धोका वाटणं हे साहजिक होतं. त्यामुळे त्यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतला असावा आणि म्हेत्रेंसारखा मातब्बर नेता भाजपमध्ये आल्यास सोलापूर जिल्ह्याच्या काँग्रेसला मोठी खिंडार पडेल त्यामुळे भाजप देखील प्रवेश देईल. मात्र म्हेत्रेंच्या प्रवेशांनंतर जर विधानसभेची उमेदवारी दिली गेली तर स्थानिकांमध्ये नाराजगी होईल हे उघडपणे दिसून येत आहे. त्यामुळे सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी आपली नाराजगी वारंवार उघडपणे बोलून दाखवली. भाजपा सत्तेत असल्याने मतदारसंघात भाजपचे डझनभर पुढारी आम्हीच खरे निष्ठावंत कार्य़कर्ते म्हणत उमेदवारीसाठी उंबरठे झिजवत आहेत.

अक्कलकोट मतदार संघात लिंगायत समाज हा सर्वाधिक आहे. त्या खालोखाल दलित आणि मुस्लीम मतदारांची संख्या आहे. अक्कलकोट मतदार संघातील जातीय समीकरणं पाहता लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच सर्वच राजकीय पक्षांनी प्राधान्य दिलं. जनतेचा कौल ही लिंगायत समाजातील उमेदवारालाच मिळालेला आहे.

एकीकडे भाजपकडे उमेदवारांची भाऊगर्दी झाली असली तरी म्हेत्रे भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसला उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. दरम्यान लोकसभेत खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे सहकारी असणाऱ्या नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी अस्सल राजकारण खेळत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील जातीय समीकरणांचा विचार करता श्रीकंठ शिवाचार्यांना देखील विधानसभेसाठी इच्छूक आहेत. आता काँग्रेसतर्फे विधानसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणं देखील तितकचं रंजक ठरणार आहे. एकूणच अक्कलकोट मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र जर सिद्धाराम म्हेत्रे यांना भाजप प्रवेश मिळाला तर भाजपमध्येच अंतर्गत वाद पाहायला मिळणार हे नक्की.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेदेखील चांगलेच मताधिक्य खेचण्याचा प्रयत्न केला. अँड. प्रकाश आंबेडकर यांना अक्कलकोटमधून 27 हजार 625 मते मिळाली. वंचितला मिळालेल्या या मतांच्या संख्येमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र लोकसभेत साध्य न झालेली युती विधानसभेत होईल असे चित्र सध्यातरी दिसत नाहीये. जर वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात युती न झाल्यास त्याचा थेट फटका काँग्रेसलाच बसणार हे मात्र नक्की.

अक्कलकोट विधानसभा मतदार निकाल 2014

  • सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेस – 97333
  • सिद्रामप्पा पाटील, भाजप – 79689
  • 2019 च्या लोकसभेत अक्कलकोटमधून उमेदवारांना मिळालेली मते
  • डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, भाजप – 1 लाख 4 हजार 997
  • सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस – 57 हजार 488
  • प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी – 27 हजार 625
  • भाजपला अक्कलकोटमधून मताधिक्य – 47 हजार 509
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.