…तेव्हा 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच मेसेज करतात : अमोल कोल्हे
ईव्हीएमविषयी मनात शंका आहेच, राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्या, अडीच लाखांच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येईन, असा विश्वास राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चंद्रपुरात आयोजित शिवस्वराज्य यात्रेवेळी बोलून दाखवला
चंद्रपूर : ईव्हीएमविषयी मी बोलायला लागलो, की 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवतात. ईव्हीएमविषयी मनात शंका आहे ती आहेच, (Amol Kolhe on EVM) साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलो होतो. राजीनामा देतो, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, दोन-अडीच लाखांनी निवडून आलो नाही, तर माझं नाव बदला, असं खुलं आवाहन शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe on EVM) यांनी दिलं आहे.
‘ईव्हीएम असेल, तर काय गोष्टी वेगळ्या असत्या? भाजपचे अनेक मंत्री लगेच सांगायला सुरुवात करतात, आमच्या जागा एवढ्या असत्या, आमच्या जागा तेवढ्या असत्या. ईव्हीएमविषयी जर मी सांगायला लागलो, तर 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवतात. तुम्ही निवडून आलात त्याचं काय?’ असा प्रश्न विचारला जात असल्याचं अमोल कोल्हे सांगत होते.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित केली आहे. ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात पोहचली, तेव्हा डॉ. कोल्हे बोलत होते.
…तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार
‘मी कायम जाहीरपणे सांगतो. ईव्हीएमविषयी मनात शंका आहे ती आहेच. जर ईव्हीएम नसतं, तर शिरुरमधून एक शेतकऱ्याचं साधं पोरगं साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलं. घ्या बॅलेट पेपरवर निवडणूक, घ्या राजीनामा, नाही दोन-अडीच लाखांनी निवडून आलो, तर नाव बदला माझं’ असं ओपन चॅलेंज अमोल कोल्हेंनी दिलं.
आढळराव पाटलांना उत्तर
शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्ष संपणार असल्याची टीका केली होती, त्यालाही कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं. ‘शिवस्वराज्य यात्रा संपल्यानंतर राष्ट्रवादी संपेल, असं अत्यंत धाडसी विधान शिरुरच्या माजी खासदारांनी केलं. मात्र जन आशीर्वाद यात्रा कुठे सुरु असेल, तर कळवा, अशी आताची परिस्थिती आहे.’ अशी टीका अमोल कोल्हेंनी केली.
आदित्य ठाकरेंना टोला
जन आशीर्वाद यात्रा कोणाची होती?’ असा सवाल अमोल कोल्हेंनी केला. त्यावर गर्दीतून ‘आदित्य ठाकरे’ असं उत्तर आलं असता, नशिब एकाला तरी माहित आहे, नाहीतर खूप वाईट वाटलं असतं त्यांना’ असा टोलाही अमोल कोल्हेंनी लगावला.
मुनगंटीवारांच्या मतदारसंघात शिवस्वराज्य यात्रा
बल्लारपूर हा भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. बालाजी सभागृहात आयोजित सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अमोल मिटकरी यांची उपस्थिती होती.
परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत आमचे आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत फेटा बांधणार नाही. जेव्हा आमदार होतील, त्यावेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असा निर्धार अमोल कोल्हे यांनी बीडमध्ये व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं होतं.