गेल्या दोन दशकापासून राजकीय आणि सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग आणि लेखन. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय आणि भारतीय सिनेमा, वैश्विक राजकारण, सांस्कृतिक आणि मानवीय स्वरुपांवरही सातत्याने लिखाण केलं आहे. पाणिनि आनंद याांची डीजिटल मीडियाचे विशेषज्ञ म्हणून ओळख आहे. परंतु, एक पत्रकार म्हणून भाजप, काँग्रेस आणि उत्तर भारताच्या राजकारणातील प्रमुख राजकीय पक्षांना अगदी जवळून पाहण्याचा आणि समजून घेण्याचा त्यांचा अनुभव राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दलित राजकारण, मागासवर्गांशी संबंधित मुद्दे, ग्रामीण भारत आणि आधुनिक भारतीय समाज आदी त्यांच्या लेखनाचे मुख्य विषय आहेत.