अनलॉकचा ऑटो क्षेत्राला फायदा, सप्टेंबरमध्ये 2500 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक बाईकची विक्री
सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स इलेक्ट्रिक व्हीकल्स (एसएमईव्ही) ने भारतात इलेक्ट्रिक टू-व्हिलर्सच्या विक्रीचे सप्टेंबरमधील आकडे जाहीर केले आहेत (SMEV publish Electrical two wheelers sale).
मुंबई : सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स इलेक्ट्रिक व्हीकल्स (एसएमईव्ही) ने भारतात इलेक्ट्रिक टू-व्हिलर्सच्या विक्रीचे सप्टेंबरमधील आकडे जाहीर केले आहेत (SMEV publish Electrical two wheelers sale). सप्टेंबरमध्ये एकूण 2 हजार 544 इलेक्ट्रिक बाईकची विक्री झाली आहे. यामध्ये फक्त हाय-स्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाईकच्या (एचएस ई 2 डब्ल्यू) विक्रीचा समावेश आहे (SMEV publish Electrical two wheelers sale).
सप्टेंबर 2019 मध्ये विक्री झालेल्या 1473 वाहनांच्या तुलनेत ऑटो सेक्टरमध्ये प्रत्येक वर्षाला 72 टक्क्यांची वाढ झालेली दिसत आहे.
दरम्यान गेल्यावर्षी भारतात ऑटो सेक्टरमध्ये सर्वात मोठी मंदी आली होती. याशिवाय 2020 मध्ये हाय-स्पीड इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स एथर 450 एक्स, बजाज, चेतक आणि टीव्हीएस आयक्यूब लाँच केल्याने ऑटो क्षेत्रातील विक्रीच्या आकड्यात बदल झाले आहेत.
फायनेंशिअल वर्ष 2020-21 च्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर 2020 च्या दरम्यान एकूण इलेक्ट्रिक टू व्हीलर्सची विक्री 7552 यूनिट आहे. ही विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेने 25 टक्क्यांनी यंदा घसरलेली दिसत आहे.
“स्थिर विक्रीच्या मुख्य कारणांमध्ये एक आहे की, ग्राहक कोरोना लॉकडाऊन काळात वाहन खरेदी करण्यास सक्षम नव्हते. पण देशात अनलॉकच्या घोषणेनंतर ऑटो सेक्टरमध्ये लवकरच घटलेल्या विक्रीत वाढ होत असल्याचे दिसत आहे”, असं एसएमईव्हीचे महानिदेशक सोहिंदर गिल यांनी सांगितले.
“भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलर्सच्या मागणीत वाढ झाली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 1793 इलेक्ट्रिकच्या तुलनेत ऑटो सेक्टरमध्ये प्रत्येक महिन्याला 42 टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलै 2020 मध्ये 1343 टू व्हीलर्सच्या तुलनेने सप्टेंबर 2020 मध्ये 89 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. येणाऱ्या दसरा, दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात बाईकच्या मागणीत वाढ होऊ शकते आणि कोरोना लॉकडाऊनमुळे जे नुकसान झाले ते ठीक होण्यास मदत होऊ शकते”, असंही गील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
Tesla Car | एलन मस्कचा संकेत, भारतीय बाजारपेठेत टेस्लाचे आगमन होणार!