नवीन i20 चे फोटोही लीक झाले आहेत. ज्यामध्ये कारचा रिअर आणि फ्रंट लूक समोर आला आहे. नवीन i20 च्या फ्रंट लूकमध्ये पाहिले तर, फ्रंटमध्ये मोठे ग्रिल, शार्प हेडलॅम्प आणि सिग्नेचर एलईडी डीआरएल दिले आहेत. रुफलाईन आणि शार्प स्टाईलचा सी-पिलरमुळे कारचा लूक अप्रतिम वाटत आहे. तर नवीन i20 च्या मागच्या बाजूला रॅपअराऊंड एलईडी टेललाईट आहे.