Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेस्टिव्ह सीजनमध्येही वाहन कंपन्यांना मोठा फटका, विक्रीत 24 टक्क्यांची घट

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लोक दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करतील, असा अंदाज होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीत घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

फेस्टिव्ह सीजनमध्येही वाहन कंपन्यांना मोठा फटका, विक्रीत 24 टक्क्यांची घट
Follow us
| Updated on: Nov 09, 2020 | 7:23 PM

मुंबई : कोरोना महामारी (Corona Pandemic) आणि लॉकडाऊनमुळे (lockdown) देशातील ऑटो इंडस्ट्रीला (Automotive industry) मोठा फटका बसला होता. अनलॉकची (Unlock) प्रक्रिया सुरु केल्यानंतर वाहनविक्री पुन्हा सुरु झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अनेक कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये (Auto sales october) त्यामध्ये आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसह वाहन कंपन्यांनी व्यक्त केली होती, परंतु तसे झालेले दिसत नाही. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर (festive season) लोक दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी करतील, असा अंदाज होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात वाहन विक्रीत घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

केवळ काही कंपन्यांच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत थोडीफार वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी, ह्युंदाई, टाटा मोटर्स आणि किया मोटर्स या कंपन्यांचा बाजारात बोलबाला पाहायला मिळाला. मात्र इतर कंपन्यांच्या विक्रीत घट झाली आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (फाडा) दिलेल्या माहितीनुसार प्रवासी वाहनांच्या विक्रीत देशभरात 8.8 टक्क्यांची घट झाली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 2 लाख 73 हजार 980 प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. तर यंदा ऑक्टोबर महिन्यात 2 लाख 49 हजार 860 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे.

दुचाकींच्या बाबतीतही फार चांगलं चित्र पाहायला मिळालेलं नाही. ऑक्टोबर महिन्यात यंदा 10 लाख 41 हजार 682 दुचाकींची विक्री झाली आहे, तर गेल्या वर्षी याच महिन्यात 14 लाख 23 हजार 394 बाईक्सची विक्री झाली होती. दुचाकीच्या विक्रीत तब्बल 26.82 टक्क्यांची घट झाली आहे.

कमर्शियल व्हेईकल्सना (व्यावसायिक वाहनं) सर्वात मोठा फटका बसला आहे. कमर्शियल व्हेईकल्सच्या विक्रीत तब्बल 30.32 टक्क्यांची घट झाली आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात 44 हजार 480 कमर्शियल व्हेईकल्सची विक्री झाली आहे. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या सेगमेंटमध्ये तब्बल 63 हजार 837 युनिट्सची विक्री झाली होती.

एकंदरित सर्व प्रकारच्या वाहनांच्या विक्रीचा विचार केला असता, वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबर महिन्यात 23.99 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 18 लाख 59 हजार 709 वाहनांची विक्री झाली होती. तर यंदा ऑक्टोबर महिन्यात 14 लाख 13 हजार 549 वाहनाची विक्री झाली आहे.

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘या’ पाच बाईक्स खरेदी करा आणि मिळवा 43 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Mahindra ची खास स्कीम, कोणत्याही वाहनावर 11,500 रुपयांचा डिस्काऊंट

जुन्या गाडीच्या बदल्यात नवी गाडी घेऊन जा; सरकारकडून विशेष सूट

Hyundai ची All New i20 कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Big loss for auto companies, 24 percent decline in sales)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.