लवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त…

मारुती सुझुकी लवकरच आपली छोटी आणि स्वस्त किंमतीची एसयूव्ही कार लाँच करत आहे. या मायक्रो एसयूव्हीचे नाव S-Presso आहे.

लवकरच मारुती सुझुकीची छोटी SUV भेटीला, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Aug 24, 2019 | 7:33 PM

मुंबई : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) लवकरच आपली छोटी आणि स्वस्त किंमतीची एसयूव्ही कार लाँच करत आहे. या मायक्रो एसयूव्हीचे नाव S-Presso आहे. कंपनी ही कार 30 सप्टेंबरला लाँच करण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही कार कंपनीने सर्वातआधी ऑटो एक्सपो 2018 मध्ये सादर केली होती.

या कारचे काही फोटो लिक झाले आहेत. फोटो पाहून ही नवीन कार एसयूव्हीसारखी दिसते. यामध्ये अलॉय व्हील्स दिलेले नाही, असं म्हटलं जात आहे. कारमध्ये रिअरमध्ये ब्रेक, लाईट्ससह स्वेप्टबॅक, टेललॅम्प्स असू शकतात. याशिवाय यामध्ये हेलोजन लाईट्स आणि शार्प हेडलॅम्प्स मिळतील.

वॅगनआर, स्विफ्ट आणि अर्टिगा सारख्या कारप्रमाणे कंपनी या कारला Heartect प्लॅटफॉर्मवर तयार करणार आहे. सेफ्टीसाठी कंपनी यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, एबीएस, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि सीट बेल्ट रिमायंडरसारखे फीचर्स देणार आहे. ही नवीन छोटी एसयूव्ही क्रॅश टेस्टसारखी असू शकते, असंही सांगितलं जात आहे.

या कारच्या इंजिनमध्ये BS6 1.0 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन अल्टो K10 कारसारखेही मिळू शकते. दरम्यान, अल्टोच्या तुलनेत या कारची किंमत थोडी जास्त असू शकते. या कारची किंमत भारतात 3.5 लाख ते 4.5 लाखांपर्यंत असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.