Petrol की Diesel? कोणती कार खरेदी करणे फायदेशीर ठरणार?
कार खरेदी करायची असेल तर नेमकी कोणती कार घ्यावी हा मोठा प्रश्न असतो. कोणत्या कंपनीची कार घ्यावी, मायलेज काय आहे, डिझेल कार (Diesel Car) घ्यावी की पेट्रोल कार (Petrol Car) असे अनेक प्रश्न पडतात. जर या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर कोणती कार फायदेशीर ठरेल हे लक्षात येऊन कार खरेदी अगदी सोपी होऊन जाते.
मुंबई : कार खरेदी करायची असेल तर नेमकी कोणती कार घ्यावी हा मोठा प्रश्न असतो. कोणत्या कंपनीची कार घ्यावी, मायलेज काय आहे, डिझेल कार (Diesel Car) घ्यावी की पेट्रोल कार (Petrol Car) असे अनेक प्रश्न पडतात. जर या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर कोणती कार फायदेशीर ठरेल हे लक्षात येऊन कार खरेदी अगदी सोपी होऊन जाते. त्यासाठी प्रथम पेट्रोल आणि डिझेल कारचा तुलनात्मक (Comparison of Petrol and Diesel Car) विचार करायला हवा.
पेट्रोल कार अधिक शक्तिशाली
कारचं पेट्रोल व्हर्जन डिझेलच्या तुलनेत अधिक शक्तिशाली आहे. मात्र, कारचं मायलेज डिझेल कारच्या तुलनेत कमी आहे. तुम्हाला कार व्यावसायिक उपयोगासाठी घ्यायची असेल तर मग तुमच्यासाठी डिझेल कार अधिक फायदेशीर ठरेल. रोज 50 किमी आणि महिन्याला 1500 किमीहून अधिक प्रवास करणाऱ्यांसाठी डिझेल कार अधिक योग्य पर्याय आहे.
पेट्रोल कार अधिक स्वस्त
सर्वसामान्यपणे पेट्रोल कार डिझल कारच्या तुलनेत स्वस्त असतात. मारुती सुझुकी स्विफ्ट पेट्रोल VXI व्हेरिअंटची दिल्लीत किंमत 6.14 लाख रुपए आहे. तर याच कारची डिझेल VDI व्हेरिअंटची किंमत 7.03 लाख रुपये आहे. पेट्रोल कारची विक्री करताना चांगली किंमत
पेट्रोल कारची विक्री करण्याची वेळ आली तर ती चांगल्या किमतीला विकली जाते. या कारची रिसेल वॅल्यू बराच काळ चांगली असते. त्या तुलनेत डिझेल कारची रिसेल किंमत लवकर कमी होते. व्यावसायिक क्षेत्रात सेकंड हँड डिझेल गाड्यांना मोठी मागणी आहे.
पेट्रोल कारचा मेंटनन्स कमी
डिझेल कारच्या तुलनेत पेट्रोल कारचा देखभाल दुरुस्ती खर्च खूप कमी आहे. डिझेल कारमध्ये अधिक स्पेअर पार्ट्स असतात. त्यामुले त्यांची देखभाल करण्यासाठी अधिक खर्च होतो. उदाहरण बघायचं झालं तर 24 महिने किंवा 20,000 किमी चालल्यानंतर मारुती पेट्रोल कारचा चौथ्या पेड सर्विसचा खर्च जवळपास 5,300 रुपये, तर मारुती डिझेल कारचा खर्च जवळपास 6,500 रुपये येतो.
तज्ज्ञांच्या मते डिझेल कारचे इंजिन अधिक चांगले
दोन्ही प्रकारच्या इंजिनच्या योग्यतेविषयी नेहमीच वाद होत आला आहे. यावर अनेक मतमतांतरे आहेत. ऑटोमोबाईल तज्ज्ञांनुसार पेट्रोल इंजिनच्या तुलनेत डिझेल इंजिनचे आयुष्य कमी असते. डिझेल इंजन कॉम्प्रेशन टाईपच्या इग्निशनवर काम करते. ऑटोमोबाईल इंजिनिअरनुसार एक सर्वसाधारण डिझेल इंजिन 3,00,000 किमीपर्यंत चालते. याव्यतिरिक्त ट्रक, मिनी व्हॅन, बस आणि डिझेल इंजिनचंही आयुष्य चांगलं असतं.