विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास Driving License निलंबित होणार

तुम्ही जर वाहतुकीची नियम मोडत असाल, प्रामुख्याने दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करत नसाल तर आत्ताच सावध व्हा!

विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास Driving  License निलंबित होणार
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 11:35 PM

बंगळुरु : रस्त्यांवर होणारे अपघात आणि दुर्घटना रोखण्यासाठी सरकार सातत्याने वाहन चालवणाऱ्यांसाठी आणि सोबत प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षेचे वेगवेगळे अनेक नियम जारी करत असतं. परंतु आपल्या देशातील नागरिक नियमांचा सातत्याने भंग करत असतात. तुम्हीही जर असे नियम मोडत असाल, प्रामुख्याने दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करत नसाल तर आत्ताच सावध व्हा! कारण जर तुम्ही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना सापडलात तर तुम्हाला दंड तर द्यावा लागेलच, परंतु सोबत तुमचा वाहन चालक परवाना (Driving License) निलंबित केला जाऊ शकतो. (driving license will suspend for 3 months if found driving without helmet)

अपघात आणि दुर्घटनांची वाढती आकडेवारी पाहता कर्नाटक सरकारने नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर परिवहन विभाग मोठी कारवाई करणार आहे. अशा वाहनचालकांचा दंडासह तीन महिन्यांकरिता वाहन चालक परवाना रद्द केला जाणार असून त्याची काटेकोरपणे अंलबजावणी करण्याची तयारी केली जात आहे.

सरकारचा हा आदेश चार वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांनादेखील लागू होतो. कर्नाटक ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने म्हटलं आहे की, चार वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांसाठीदेखील हेल्मेट आवश्यक आहे. या नियमाचे पालन न केल्यास चालक परवान रद्द होईलच सोबत 1000 रुपयांपर्यंतचा दंडदेखील भरावा लागणार आहे.

कर्नाटकमध्ये 1.65 कोटी नोंदणीकृत दुचाकी वाहने असून त्यापैकी सुमारे 59.9 लाख दुचाकी वाहने केवळ बंगळुरुमध्ये आहेत. दरम्यान मोटार वाहन कायद्यात 2019 च्या दुरुस्तीनंतर हेल्मेटशिवाय दुचाकी चालविल्याबद्दल एक हजार रुपयांच्या दंडासह तीन महिने वाहन परवाना रद्द करण्याची तरतूद आहे. परंतु या नियमास आणि दंडाच्या रकमेस मोठा विरोध झाला. त्यामुळे कर्नाटक सरकारने दंडाची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करून 500 रुपयांवर आणली होती.

दरम्यान, यावर्षी सप्टेंबरपर्यंत विना हेल्मेट दुचाकी चालविल्याप्रकरणी राज्यात तब्बल 20 लाखांहून अधिक चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Swift limited Edition : शानदार ब्लॅक थीमसह नवीन मारुती स्विफ्ट लाँच

सरकारी कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीचं गिफ्ट; खास सवलतीसह आवडती कार खरेदीची संधी

Festival Offer : हीरोच्या ‘या’ स्कूटरवर 15 हजार रुपयांचा डिस्काऊंट

Festival Offer : दसरा, दिवाळीत Jeep Compass वर 1.5 लाखांची सूट

(driving license will suspend for 3 months if found driving without helmet)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.