Tata Harrier Dark Edition च्या फोटोनंतर आता किंमतही लीक

Tata Harrier Dark Edition ही SUV च्या टॉप व्हेरिएंट XZ वर आधारित आहे. यामध्ये XZ वाले सर्वच फीचर्स मिळतील. Dark Edition ही अनोख्या अॅटलस ब्लॅक रंगात लाँच होईल.

Tata Harrier Dark Edition च्या फोटोनंतर आता किंमतही लीक
Follow us
| Updated on: Aug 30, 2019 | 4:32 PM

मुंबई : लोकप्रिय चारचाकी कंपनी Tata Motors त्यांच्या प्रसिद्ध SUV HARRIER चं नवं व्हेरिएंट लाँच करणार आहे. Tata Harrier Dark Edition या नावाने ही SUV लाँच केली जाईल. मात्र, लाँचिंगपूर्वीच या गाडीचे फोटो लीक झाले होते. त्यानंतर आता या गाडीची किंमतही लीक झाली आहे (Tata Harrier Dark Edition Price Leak). रिपोर्ट्सनुसार, Tata Harrier Dark Edition ची किंमत 16,75,755 रुपये असेल. ही किंमत Harrier च्या XZ ड्यूअल-टोन व्हेरिएंट इतकी आहे.

Tata Harrier Dark Edition ही SUV च्या टॉप व्हेरिएंट XZ वर आधारित आहे. यामध्ये XZ चे सर्वच फीचर्स मिळतील. Dark Edition ही अनोख्या अॅटलस ब्लॅक रंगात लाँच होईल. यामध्ये 17-इंचाचे ब्लॅकस्टोन अलॉय व्हील आणि फ्रंट आणि रिअरमध्ये ब्लॅक स्कीड प्लेट्स असेल. त्याशिवाय, यावर ग्रे हेडलॅम्प इंसर्टही पाहायला मिळतील.

इंटीरिअर

Tata Harrier Dark Edition मध्ये ब्लॅकस्टोन डॅशबोर्डसोबत याचं कॅबिन पूर्ण काळ्या रंगात असेल. Harrier च्या स्टॅण्डर्ड व्हेरिएंटमध्ये जिथे फॉक्स वूड फिनिश देण्यात आली आहे, तिथे Dark Edition मध्ये त्या ठिकाणी मॅट ग्रे फिनिश देण्यात आली आहे. तसेच ब्लॅक लेदर सीट, डोअर पॅड आणि दाराच्या आतील हॅण्डलवरही ब्लॅक फिनिश असेल. पण याच्या डिझाईनमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच याचं डिझाईन हे स्टॅण्डर्ड व्हेरिएंटसारखेच आहे.

यामध्येही स्टॅण्डर्ड व्हेरिएंटप्रमाणे 2.0-लीटर, 4-सिलिंडर डिझल इंजिन असण्याची शक्यता आहे. हे इंजिन 3,750 rpm वर 138 bhp चा पावर आणि 1,750-2,500 rpm वर 350 Nm टॉर्क जनरेट करेल. इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आले आहेत.

BS 6 इंजिन Harrier लवकरच लाँच होणार

Tata Motors हे Harrier च्या इंजिनला BS 6 मध्ये अपडेच करणार आहे. अपडेटेड Harrier ला टेस्टिंग दरम्यान पाहाण्यात आलं आहे. BS 6 एमिशन नॉर्म्सचा पावर सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असेल. तसेच यामध्ये ऑटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात येईल. सध्याच्या SUV मध्ये फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.

संबंधित बातम्या :

लायसन्सशिवाय गाडी चालवल्यास दहापट दंड, एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे 17 नियम अधिक कडक

Petrol की Diesel? कोणती कार खरेदी करणे फायदेशीर ठरणार?

एकदा चार्ज करा, 156 किमी चालवा, Revolt ची ई-बाईक, EMI फक्त…

Harley Davidson ची भारतातली पहिली ई-बाईक, किंमत तब्बल…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.