Kia Motors च्या ‘या’ कारची मार्केटमध्ये धुम, एका महिन्यात 11,721 युनिट्सची विक्री
किआ मोटर्स इंडियाने (Kia Motors India) काही दिवसांपूर्वी त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet लाँच केली होती. या एसयूव्हीला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
कंपनीने याबाबत म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात आमच्या 21 हजार 21 कार्सची विक्री झाली आहे. त्यामध्ये किया सोनेटचे 11,721 युनिट्स. किया सेल्टॉसचे 8,900 युनिट्स आणि कार्निव्हलच्या 400 युनिट्सचा समावेश आहे.
Follow us
किआ मोटर्स इंडियाने (Kia Motors India) काही दिवसांपूर्वी त्यांची कॉम्पॅक्ट एसयूव्ही Kia Sonet लाँच केली होती. या एसयूव्हीला ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
ही कार लोकांच्या पसंतीस उतरली असल्याचे पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबर महिन्यात या कारच्या तब्बल 11 हजार 721 युनिट्सची विक्री झाली आहे.
कंपनीने याबाबत म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात आमच्या 21 हजार 21 कार्सची विक्री झाली आहे. त्यामध्ये किया सोनेटचे 11,721 युनिट्स. किया सेल्टॉसचे 8,900 युनिट्स आणि कार्निव्हलच्या 400 युनिट्सचा समावेश आहे.
कंपनीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये ऑटो सेक्टरमध्ये मोठी मरगळ आली होती. परंतु सणासुदीचा मुहूर्त साधून लोकांनी मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केल्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य पाहायला मिळत आहे.
दर 3 मिनिटात एका कारची विक्री : Kia Motors ने म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरात दर तीन मिनिटाला सरासरी एका कारची विक्री झाली आहे.