रॉयल एन्फिल्डच्या ग्राहकांना कंपनीकडून खुशखबर

रॉयल एन्फिल्ड कंपनी 350 सीसीच्यावर बाईक बनवण्यामध्ये प्रसिद्ध आहे. सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रॉयल एन्फिल्ड बाईकची क्रेझ आहे. पूर्वी पेक्षा अधिक प्रमाणात या बाईकची विक्री होत आहे.

रॉयल एन्फिल्डच्या ग्राहकांना कंपनीकडून खुशखबर
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 9:26 PM

मुंबई : रॉयल एन्फिल्ड (Royal Enfield) कंपनी 350 CC च्यावर बाईक बनवण्यामध्ये प्रसिद्ध आहे. सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात रॉयल एन्फिल्ड (Royal Enfield) बाईकची क्रेझ आहे. पूर्वी पेक्षा अधिक प्रमाणात या बाईकची विक्री होत आहे. पण या बाईकच्या सर्व्हिसिंगसाठी ग्राहकांना खूप खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेकजण ही बाईक घेताना विचार करतात. हेच लक्षात घेऊन कंपनीने सर्व्हिसिंगवर होणाऱ्या खर्चात 40 टक्के घट केली.

महागडी सर्व्हिसिंग

रॉयल एन्फिल्ड कंपनीने नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी सर्व्हिसिंगच्या किंमतीत घट केली आहे. यामुळे रॉयल एन्फिल्ड बाईकची सर्व्हिस करणे खूप स्वस्त झाले आहे. आतापर्यंत अनेकजण बाईकची सर्व्हिसिंग महाग असल्यामुळे ती खरेदी करण्यासाठी घाबरत होते.

सर्व्हिसिंगवर होणाऱ्या खर्चात 40 टक्के कपात

कंपनीने सर्व आपल्या ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजीनुसार सर्व्हिस सुरु केली आहे. आता सर्व्हिसिंग दरम्यान नवीन पद्धतीच्या सेमी-सिथेंटिक ऑईलचा वापर केला जात आहे. ज्यामुळे प्रत्येकजण 12 महिन्यानंतरही ऑईल चेंज करु शकतो. तसेच सर्व्हिसहीसारखी करावी लागणार नाही.

12 महिने 10 हजार किमीनंतर ऑईल बदलावे लागेल

सध्या बुलेट, क्लासिक आणि थंडरबर्डमध्ये 3 महिने किंवा 3 हजार किमीवर सर्व्हिस करावी लागत होती. यानंतर आता 6 महिने आणि 5 हजार किमीवर सर्व्हिस करावी लागणार आहे. ज्यामुळे सर्व्हिसवर होणाऱ्या खर्चात 40 टक्के घट होणार आहे.

बुलेटमध्ये ऑईल 6 महिने 5 हजार किमी शिवाय 12 महिने 10 हजार किमीनंतर धावल्यावर तुम्ही बदलू शकता. ज्यामुळे तीन वर्षात 40 टक्के सर्व्हिसिंग कॉस्टमध्ये घट होईल. नवीन सर्व्हिस इंप्रूवमेंट प्रोग्राम बुलेट, क्लासिक आणि थंडरबर्डवर लागू होईल. तसेच कंपनीने 250 नवीन रॉयल एन्फिल्डचे स्टोअर सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या संपूर्ण देशात रॉयल एन्फिल्डचे 930 डिलरशिप देशात आहेत.

कंपनीकडून नवीन बाईक लाँच

कंपनीने नुकतेच बुलेट प्लॅटफॉर्ममध्ये नवीन मॉडेल लाँच केले होते. कंपनीने या बाईकच्या बुकिंगलाही सुरुवात केली होती. रॉयल एन्फिल्ड 350X आणि रॉयल एन्फिल्ड ES 350X च्या किंमत रेगुलर व्हेरिअंट्सपेक्षा 10 हजाराने कमी ठेवली आहे. दिल्लीमध्ये 350X ची एक्स शोरुम किंमत 1.12 लाख रुपये आणि बुलेट ES 350X ची किंमत 1.35 लाख रुपये ठेवली आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.