रॉयल एनफिल्ड Meteor 350 सोबत ‘या’ 6 दमदार अॅक्सेसरीज मिळणार!

रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित मीटिओर 350 ही बाईक गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आली. या बाईकसोबत कंपनी सहा वेगवेगळ्या अॅक्सेसरीजही देणार आहे.

रॉयल एनफिल्ड Meteor 350 सोबत 'या' 6 दमदार अॅक्सेसरीज मिळणार!
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 4:22 PM

मुंबई : रॉयल एनफिल्डची बहुप्रतीक्षित मीटिओर 350 (Royal Enfield Meteor 350) ही बाईक गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आली. 650 ट्विन्सच्या लाँचिंगनंतर रॉयल एनफिल्डसाठी ही महत्त्वाची बाईक आहे. Meteor रेंज ही नव्या इंजिनासह विकसित करण्यात आली आहे. ही शानदार बाईक तीन व्हेरिएंट्ससह (फायरबॉल, स्टॅलर आणि सुपरनोव्हा) लाँच करण्यात आली आहे. Royal Enfield Meteor 350, थंडरबर्ड 350X ला रिप्लेस करणार आहे. (Royal Enfield is offering some accessories with Meteor 350 )

या बाईकमध्ये नवीन डिव्हाइस कन्सोल सेट-अप आणि स्प्लिट सीट डिजाईन देण्यात आली आहे. हेडलाईट आणि टेललाईटमध्येही बदल करण्यात आले आहेत. डिझाईनच्या बाबतीत या बाईकमध्ये टियर-ड्रॉप शेप्ड इंधन टॅन्क, ब्राईट कलर ऑप्शन, एलईडी लाईट आणि एका स्प्लिट-सीटचा समावेश करण्यात आला आहे. फिचर्सच्या बाबतीत बाईक दमदार आहेच, परंतु या बाईकसोबत कंपनी सहा वेगवेगळ्या अॅक्सेसरीजही देणार आहे.

क्रॅश गार्ड्स

रॉयल एनफिल्ड Meteor या बाईकसाठी तीन क्रॅश गार्ड्स बनवण्यात आले आहेत. ज्यामध्ये एयर फ्लाय इव्हो, ट्रेपॅजियम आणि ऑक्टागनचा समावेश आहे. एयर फ्लाय इव्हो 32mm स्टील ट्युब्ससह बनवण्यात आलं आहे. ट्रेपॅजियमचं डिझाईन थोडं वेगळं आहे, हे ब्लॅक पावडर कोटिंगसह येतं.

सायलेन्सर

रॉयल एनफिल्ड कंपनीने चार सायलेन्सर दिले आहेत. प्रत्येक सायलेन्सरचा आवाज वेगळा आहे. Meteor 350 साठी मार्केटमध्ये होमोलोगेटेड सायलेन्सर उपलब्ध आहे.

मिरर

Meteor 350 मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे मिरर मिळतील. पहिला टुरिंग मिरर आहे, जो अॅल्युमिनियम स्टेम्सपासून बनवला आहे. तर दुसरा बार एंड मिरर आहे, जो बेसपोक अडॅप्टर्ससह फिट केलेला असेल.

सीट

छोट्या रायडर्ससाठी सीटची उंची 11mm कमी करण्यात आली आहे. सीटमध्ये 3D नेट टेक देण्यात आली आहे. तर टुरिंग सीट फ्लॅट आहे, परंतु लांबच्या प्रवासासाठी आरामदायक आहेत.

फ्लायस्क्रीन

टिंटेड फ्लायस्क्रीन्स तुम्हाला विंड प्रोटेक्शन देतात. तर टुरिंग स्क्रीन हार्ड कोटेड आणि इंजेक्शन मॉल्डेड स्क्रॅच रेजिस्टन्ट स्क्रीन आहे. या सर्व अॅक्सेसरीजसह तुम्ही इतरही प्रोडक्ट्स खरेदी करु शकता, ज्यामध्ये साईड बॉक्स, मोटारसायकल कव्हर्स, संप गार्ड आणि फुट पेग किट्सचा समावेश आहे.

Meteor 350 मधील इतर फिचर्स

नव्या मीटिओर 350 मध्ये एक नवीन फ्रेम आणि नवीन इंजिन देण्यात आलं आहे. मीटिओर 350 मध्ये डबल-क्रॅडल चेसिसचा वापर करण्यात आला आहे. असं सांगितलं जातंय की, नवीन 350 सीसी इंजिन पूर्वीपेक्षा जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करेल. या बाईकचं इंजिन 20.2 बीएचपी आणि 27 एनएम पीक टॉर्क निर्माण करु शकतं.

मीटिओरला एक मीडियम टीएफटी कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत मेन यूनिट जे ट्रिप मीटर आणि इतर डिटेल्ससाठी अॅनालॉग स्पीडोमीटर एलईडी पॅनलसह आहे. Meteor 350 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह डिजिटल अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि नवीन टीएफटी डिस्प्लेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सुविधा आहे. RE Meteor 350 ची किंमत 1.5 लाख ते 2 लाख रुपये इतकी आहे. Benelli Imperiale 400, Jawa 300 आणि नुकतीच लाँच झालेल्या Honda H’Ness CB350 या गाड्यांना RE Meteor 350 टक्कर देईल.

संबंधित बातम्या

दिवाळीत ‘या’ पाच बाईक्स खरेदी करा आणि मिळवा 43 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

1 लिटर पेट्रोलमध्ये 95 किलोमीटर धावणार; दिवाळीत खरेदी करा ‘या’ चार बाईक

Ducati Multistrada 950s चं नवीन व्हर्जन लाँच, किंमत फक्त…

(Royal Enfield is offering some accessories with Meteor 350 )

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.