TVS ची नवी स्टार सिटी प्लस, किंमत फक्त….

विशेष म्हणजे या दुचाकींची एक्स शो रुम किंमत 54 हजार रुपयांपासून सुरु आहे. नवीन ड्युएल टोन एडिशनमध्ये प्रीमियम ड्युएल टोन सीट, स्टायलिश ड्युएल टोन आरसे, रंगीत शॉक एब्सॉर्बर्स ही खास वैशिष्ट्ये आहेत.

TVS ची नवी स्टार सिटी प्लस, किंमत फक्त....
Follow us
| Updated on: Sep 09, 2019 | 7:15 PM

मुंबई : सण-उत्सवांपूर्वी टीव्हीएसने (TVS Star City Plus special edition) दोन खास दुचाकी लाँच केल्या आहेत. 110 सीसीच्या स्टार सिटी प्लसच्या या दोन एडिशन (TVS Star City Plus special edition) आहेत. विशेष म्हणजे या दुचाकींची एक्स शो रुम किंमत 54 हजार रुपयांपासून सुरु आहे. नवीन ड्युएल टोन एडिशनमध्ये प्रीमियम ड्युएल टोन सीट, स्टायलिश ड्युएल टोन आरसे, रंगीत शॉक एब्सॉर्बर्स ही खास वैशिष्ट्ये आहेत. 110 सीसी गाड्यांमध्ये टीव्हीएस स्टार सिटी+ ही अतिशय स्टायलिश आणि दमदार कामगिरी बजावणारी दुचाकी मानली जाते. त्यातच आता नव्या रंगात आणि नव्या रुपात ही दुचाकी आली आहे.

ऑटोमॅटिक हेडलाईट ऑन (एएचओ) आणि या श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी परिपूर्ण टीव्हीएस स्टार सिटी+ मध्ये हनीकोम्ब टेक्श्चर्ड साईड पॅनेल ग्रिल्स आहेत. यामुळे गाडीचा प्रभाव कायम राखला गेला असून स्टायलिंग अधिक जास्त वाढली असल्याचं कंपनीने म्हटलंय.

प्रथम दर्जाच्या स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले मफलर या बाईकच्या रंगीत शॉक एब्सॉर्बर्सना आणि स्पोर्टी अॅल्युमिनियम ब्लॅक ग्रॅब रेलला शोभून दिसतात. ब्लॅक अलॉय व्हील्स, प्रीमियम थ्रीडी एम्ब्लेम्स आणि स्टायलिश फ्लॅशी टेल लॅम्प यामुळे गाडीची शान अधिकच वाढली आहे.

रायडिंगचा अनुभव आणखी चांगला व्हावा यासाठी कंपनीने या दुचाकींमध्ये टेलिस्कोपिक फ्रंट शॉक एब्सॉर्बर्स आणि पाच स्टेप अॅडजस्टेबल रिअर शॉक एब्सॉर्बर्स दिले आहेत, ज्यामुळे जवळपास प्रत्येक प्रकारच्या रस्त्यावर तुमची टीव्हीएस स्टार सिटी+ राईड अगदी सुरळीतपणे पार पडते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हाय ग्रीप, बटन टाईप, ट्यूबलेस टायर्स यामुळे रस्ता आणि टायर सतत एकमेकांच्या संपर्कात राहतात आणि गाडी घसरण्याचा धोका कमी होतो. पॅडेड ड्युएल टोन सीट दर्जेदार मटेरिअलपासून बनवलेली आहे, बऱ्याच वेळाचा लांबवरचा प्रवास असला तरी ही सीट तुम्हाला अजिबात त्रासदायक होत नाही. सॉफ्ट टच प्रीमियम स्विच गिअरमुळे याच्या आरामदायी प्रवासात अधिकच भर पडते, असंही कंपनीने म्हटलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.