कार-बाईक घेण्यासाठी ‘या’ दिवसापर्यंत थांबा, IRDA चे नियम बदलल्याने वाहनांची किंमत कमी होणार
विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDA) नव्या नियमांमुळे 1 ऑगस्टपासून कमी किमतीत वाहन खरेदी करता येणार आहे (Vehicle prices cheaper IRDA rules).
मुंबई : कार किंवा टू-व्हीलर वाहनांची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाच्या (IRDA) नव्या नियमांमुळे 1 ऑगस्टपासून कमी किमतीत वाहन खरेदी करता येणार आहे (Vehicle prices cheaper IRDA rules). या नव्या नियमांमुळे ऑन रोड वाहनांच्या किमतीत काहीशी घट पाहायला मिळणार आहे. आयआरडीएने आपल्या 3 ते 5 वर्षांची विमा योजना बंद केली आहे. आता पुन्हा एकदा नवे वाहन खरेदी करताना एक वर्षांचा विमा कव्हर घेता येणार आहे.
आधी ग्राहकांना वाहन खरेदी करताना दीर्घ विमा घ्यायचा नसेल तर इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे वाहन खरेदी करताना 3 किंवा 5 वर्षांचा विमाच बंधनकारक होता. मात्र, आता आयआरडीएच्या बदललेल्या नियमानुसार 3 किंवा 5 वर्षांचे दीर्घ विमा बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी एक वर्षांचा अल्प मुदतीचा विमा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता नवं वाहन खरेदी करताना एक वर्षांचा कव्हर असलेला विमा खरेदी करता येणार आहे. कार किंवा टू व्हीलर वाहन खरेदी करताना 3 किंवा 5 वर्षांच्या विम्याची सक्ती नसणार आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मोटर वाहन धोरणात (Motor Vehicle Policy) झाल्यानंतर ग्राहकांसाठी पुढील महिन्यापासून कार (Car) किंवा बाईक (Bike) खरेदी करणं थोडं स्वस्त होणार आहे. या निर्णयाचा फायदा कोट्यावधी वाहनधारकांना होणार आहे. IRDA ने दीर्घ मुदतीच्या वाहन विम्यामुळे वाहन खरेदी महागडी होत असल्याचं म्हणत हा निर्णय घेतला आहे.
3 किंवा 5 वर्षांच्या विम्याचा नियम 2018 पासून सुरु
आयआरडीएने (IRDA) यावर्षी जून महिन्यात दीर्घ मुदतीचे वाहन विमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सप्टेंबर 2018 मध्ये दीर्घ विमा योजना लागू करण्यात आली होती. त्यामुळे वाहन खरेदी करताना ग्राहकांना हा विमा खरेदी करणं बंधनकारक होतं. या विम्या अंतर्गत ग्राहकांना नुकसान भरपाईचं संरक्षण मिळत होतं. दीर्घकालीन विमा धोरणात दुचाकींसाठी 5 वर्षांचा आणि चारचाकी वाहनांसाठी 3 वर्षांचा विमा होता.