Volkswagen भारतात 2 नव्या SUV लाँच करणार, जाणून घ्या फिचर्स

फोक्सवॅगन (Volkswagen) कंपनी भारतात दोन नवीन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.

Volkswagen भारतात 2 नव्या SUV लाँच करणार, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 9:13 PM

मुंबई : भारतीय मार्केटमधील स्वतःची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी कार निर्मित करणारी कंपनी फोक्सवॅगनने (Volkswagen) पुढील दोन-तीन वर्षांमध्ये चार नव्या एसयूव्ही लाँच करण्याची घोषणा केली होती. कंपनीने त्यापैकी दोन नव्या गाड्या T-ROC मिड साइज प्रिमियम एसयूव्ही आणि Tiguan AllSpace यावर्षी लाँच केल्या. त्यानंतर आता कंपनी अजून दोन एसयूव्ही लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. (Volkswagen to launch two SUV in india, check details about it)

मिळालेल्या माहितीनुसार फोक्सवॅगन 2021 च्या पहिल्या सहामाहित Taigun मिड-साईज एसयूव्ही लाँच करणार आहे. चौथी एसयूव्ही कधी लाँच केली जाणार आहे, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. परंतु 2021 च्या दुसऱ्या सहामाहित दुसरी एसयूव्ही लाँच केली जाऊ शकते. दरम्यान सध्या अशा चर्चा आहेत की, फोक्सवॅगन कंपनी ह्युंदाई व्हेन्यू (Hyundai Venue), किया सोनेट (Kia Sonet), टाटा नेक्सॉन (Tata Nexon) आणि फोर्ड इकोस्पोर्टसारख्या (Ford EcoSport) गाड्यांच्या स्पर्धेत सब-4 सीटर एसयूव्ही लाँच करु शकते.

फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे संचालक Steffen Knapp यांनी बिझनस इन्सायडरशी बोलताना सांगितले की, कंपनी सध्या योग्य ट्रॅकवर आहे. नुकतेच आम्ही दोन प्रोडक्ट मार्केटमध्ये लाँच केले आहेत. पुढील वर्ष हे Volkswagen Taigun चं असेल.

Taigun खास काय असणार?

कंपनीने दावा केला आहे की, नवीन Taigun स्टायलिंग, टेक्नोलॉजी आणि सुरक्षेच्या बाबतीत मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटचं रि-डिफाईन व्हर्जन असेल. या कारला 1.0 लीटर, 3 सिलिंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5 लीटर TSI EVO इंजिनासह सादर केलं जाऊ शकतं. 1.0 लीटर इंजिनमध्ये 115bhp इतकी पॉवर आणि 200Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. तर 1.5 लीटर इंजिनमध्ये 148bhp पाॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

BMW ची सर्वात किफायतशीर सेडान लाँच

बीएमडब्लू (BMW) सेडान 2 सिरीज ग्रॅन कूप नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या शानदार कारची किंमत 39.3 लाख रुपयांपासून सुरु होते. त्यामुळे ही BMW ची सर्वात स्वस्त सेडान ठरली आहे. ही BMW 2 सिरीज भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या इंजिनासह उपलब्ध होणार आहे. सध्या ही सिरीज 220 डी व्हेरिएंटसह समोर आणली आहे. पेट्रोल 220 आय व्हेरिएंट लवकरच लाँच होणार आहे.

ही बीएमडब्ल्यूची पहिली अशी सेडान आहे ज्यात चार दरवाजे देण्यात आले आहेत. 4-डोअर कूपप्रमाणे या कारची बॉडीस्टाईल डिजाईन करण्यात आली आहे. ही सेडान स्टॉर्म बॉय (ग्रे), स्नॅपर रॉक्स (टीले / अॅक्व्हा), मिस्नो ब्लूसह सात वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. सेडान 2 सिरीज ही यूकेएल फ्रंट व्हील ड्राइव्ह मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे.

नव्या सेडानमध्ये 220 डी सोबत 2.0 लीटरचं डिझेल इंजिन देण्यात आलं आहे, हे इंजिन 190 बीएचपी पॉवर आणि 400 एनएम टॉर्क निर्माण करतं. या इंजिनामुळे ही कार 7.5 सेकंदात 0-100 किमी प्रतितास इतका वेग घेऊ शकते. कंपनीने कारचे इंजिन 8-स्पीड स्टेप-ट्रॉनिक ट्रान्समिशनसह तयार केलं आहे.

संबंधित बातम्या

MG Motors च्या ‘या’ SUV ची मार्केटमध्ये धुम, तीन आठवड्यात रेकॉर्डब्रेक विक्री, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

अवघ्या नऊ महिन्यात ‘या’ SUV चे सर्व युनिट्स विकले; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स

SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा धडाका; पाच शानदार कार लाँच होणार

(Volkswagen to launch two SUV in india, check details about it)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.