2021 Jaguar F-Pace Facelift साठी भारतात बुकिंग सुरु, लवकरच लाँच होणार
जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने भारतात अधिकृतपणे 2021 एफ-पेस फेसलिफ्ट (2021 F-Pace facelift) या कारसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे.
मुंबई : जॅग्वार लँड रोव्हर इंडियाने (JLR) अधिकृतपणे भारतात 2021 एफ-पेस फेसलिफ्ट (2021 F-Pace facelift) या कारसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. सप्टेंबर 2020 मध्ये जागतिक बाजारात एंट्री केलेल्या अपडेटेड एसयूव्हीमध्ये नवीन बदल करण्यात आले असून त्यात सुधारित एस्टीरियर स्टाईलिंग, नवीन इंटीरियर आणि कनेक्टेड टेक्नोलॉजीचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय जेएलआर इंडिया आपल्या नवीन एसयूव्हीसह न्यू जनरेशन 2.0-लीटर Ingenium डिझेल इंजिन सादर करीत आहे. (2021 Jaguar F-Pace Facelift booking started in India, launching soon)
भारतात, नवीन जॅग्वार एफ-पेस देखील टॉप-स्पेक आर-डायनामिक एस ट्रिम (पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पॉवरट्रेनमध्ये) मध्ये देण्यात येईल. या कारचे वितरण मे 2021 पासून सुरू केले जाईल. या घोषणेवर भाष्य करताना, जॅग्वार लँड रोव्हर इंडियाचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक रोहित सूरी म्हणाले की, “नव्या अवतारात नवीन जॅग्वार एफ-पेसचं स्टँडआउट डिझाईन, आकार, जबरदस्त परफॉरमन्स आणि उत्तम एक्सपीरियन्ससह भारतीयांचं मन जिंकेल.
2021 F-Pace Facelift ‘हे’ बदल केले जाणार
- 2021 एफ-पेसच्या व्हिज्युअल अपडेट्समध्ये नवीन ग्रिल, नवीन क्लस्टर पॅटर्नसह एलईडी हेडलाइट्स आणि मोठ्या इंटेकसह नवीन फ्रंट बम्परचा समावेष आहे.
- SUV मध्ये अलॉय व्हील्सचा नवीन सेट, रिफ्रेश एलईडी टेल लाइट्स आणि नवीन रीअर बम्पर देखील मिळेल. दुसरीकडे, केबिनला नव्याने डिझाइन केलेल्या डॅशबोर्डसह अधिक डिटेल्ड अपडेट प्राप्त झाले आहेत.
- यामध्ये लेटेस्ट जनरेशन पीव्ही प्रो इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह एक मोठा डिस्प्ले मिळेल, जो अनेक कनेक्टेड फीचर्सचा दावा करतो.
- SUV मध्ये नवीन 12.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रोटरी डायलची जागा घेणारा एक छोटा शिफ्टर लीव्हर आणि आय-पेस प्रमाणेच टच-सेन्सेटिव्ह बटणांसह नवीन स्टीयरिंग देखील मिळते.
- जॅग्वार दोन ड्युअल-टोन इंटिरियर ट्रिम ऑप्शन्स ऑफर करत आहे – मार्स रेड आणि सिएना टॅन, ज्यामध्ये सॉफ्ट-टच पॅनेल आहेत, तसेच कीलेस एंट्री आणि 14 स्पीकर मेरीडियन साऊंड सिस्टम सारख्या फीचर्सचा समावेश आहे.
शानदार इंजिन
लाँचिंगच्या वेळी इंडिया-स्पेस मॉडेलच्या इंजिनाच्या डिटेल्सचा खुलासा होण्याची शक्यता आहे. नवीन 2.0 लिटर, चार सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन 243 बीएचपी पॉवर, तर 3.0 लिटर, 6-सिलेंडर, टर्बोचार्ज्ड पेट्रोल युनिट 330 बीएचपी पॉवर निर्माण करतं. टॉप-स्पेक आर-डायनामिक एस ट्रिममध्ये 390 बीएचपी पॉवर जनरेट करण्यासाठी समान इंजिनचे ट्यून केलेले आहे.
New Jaguar F-PACE. Bookings Now Open.#Jaguar’s award-winning SUV has evolved. With an assertive new exterior, beautifully crafted all-new interior and the latest generation Pivi Pro infotainment system, the new #FPACE is ready for Indian roads. pic.twitter.com/mW2BGcNKUN
— Jaguar India (@JaguarIndia) April 6, 2021
इतर बातम्या
ही जबरदस्त कार 8 लाख रुपये सवलतीत उपलब्ध, कार विकत घेण्याची चांगली संधी
सिंगल चार्जमध्ये 563 किमी धावणार, Hummer EV च्या लूकची चाहत्यांना भुरळ
सिंगल चार्जवर 500KM रेंज, Kia EV6 कार खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा
(2021 Jaguar F-Pace Facelift booking started in India, launching soon)